Monday, April 15, 2024

अर्जुन रामपाल वयाच्या 50व्या वर्षी होणार चौथ्यांदा बाप, अभिनेत्याच्या प्रेयसीने दिली गाेडबातमी

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल व्यावसायिक आयुष्यासाेबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असताे. अशातच यावेळीही अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. खरे तर, अर्जुन राजपालची गर्लफ्रेंड आणि दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स लवकरच तिच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहे.

गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (gabriella demetriades) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम एक पाेस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने ती दुसऱ्यांदा प्रेग्रंट असल्याची माहिती दिली आहे. गॅब्रिएलाने फाेटाे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रियलिटी की आर्टिफिशियल इंटेलीजेंस?’ गॅब्रिएला हिला मॅटर्निटी फोटोशूटमधून पाहून, चाहते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून तिचे आणि अर्जुनचे अभिनंदन करत आहेत.

अर्जुनला पहिल्या पत्नी पासून आहेत दाेन मुली
विशेष म्हणजे 18 जुलै 2019 रोजी अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला यांनी मुलगा अरिक रामपालचे स्वागत केले. गॅब्रिएला जिथे तिच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करणार आहे, तिथेत अर्जुनबद्दल बाेलायचे झाले, तर ताे चौथ्यांदा वडिल होणार आहे. अर्जुनने 1998 मध्ये सुपरमॉडेल मेहर जेसियाशी लग्न केले होते. या लग्नातून माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Rampal (@rampal72)

अर्जुनने लग्नाच्या 21 वर्षानंतर पहिल्या पत्नीसाेबत घेतला घटस्फाेट
माहिकाचा जन्म 2002मध्ये ,तर मायराचा जन्म 2005 मध्ये झाला होता. मात्र, दुर्देवी 2019 मध्ये अर्जुन-मेहरचा घटस्फोट झाला आणि लग्नाच्या 21 वर्षानंतर दोघेही एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. मेहर विभक्त झाल्यानंतर अर्जुन त्याची मैत्रीण आणि मुलासोबत वेगळा राहू लागला. दोघेही जवळपास 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.(bollywood actor arjun rampal ready to welcome his 4 child his girlfriend gabriella demetriades announces second pregnancy with maternity shoot pics)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं

काश्मीर फाइल्सला पुरस्कार न मिळाल्यामुळे नाराज अनुपम खेर यांचा फिल्मफेयर निशाणा म्हणाले, ‘इज्जत महाग गोष्ट…’

हे देखील वाचा