Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड ‘मिठाईच्या ऐवजी एक फोन…’, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी परत केली होती अमिताभ बच्चन यांनी पाठवलेली मिठाई; ‘हे’ होते कारण

‘मिठाईच्या ऐवजी एक फोन…’, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी परत केली होती अमिताभ बच्चन यांनी पाठवलेली मिठाई; ‘हे’ होते कारण

बॉलिवूड जगात अशा काही जबरदस्त जोड्या होऊन गेल्या की, ज्यांनी पडद्यावर खूप जास्त प्रसिद्धी मिळवली. मात्र, खऱ्या आयुष्यात या जोड्यांचे फारसे पटताना दिसले नाही, तर काही कलाकार असे आहेत ज्यांनी आपापसातल्या मतभेदांमुळे सोबत कधीच काम केले नाही. यातीलच एक जोडी म्हणजे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा होय. आज याच जोडीबद्दल आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

पडद्यावर अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा या जोडीने मिळून अशी काही जादू केली की, चाहत्यांकडून या जोडीला फार पसंती मिळाली. या जोडीने प्रेक्षकांच्या मनात तर आपले घर बनवले, परंतु खऱ्या आयुष्यात त्यांचे मतभेद कायमच बघायला मिळाले.

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोन्ही कलाकार प्रसिद्धीच्या अशा एका वळणावर होते की, प्रसिद्धीवरून त्या दोघांमध्ये मतभेद वाढले. स्वतः शत्रुघ्न सिन्हा यांनी एक दिवस अमिताभ बच्चन यांच्यासमोरच सांगून टाकले की, माझ्या होत असलेल्या प्रसिद्धीमुळे तुमच्या मनात आकस असल्याचे मला दिसते आहे. यानंतर या दोन्ही कलाकारांमध्ये एवढे वाद वाढले की, जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या मुलाचे लग्न अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत होत होते, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना लग्नाचे आमंत्रणच दिले नव्हते.

अमिताभ बच्चन यांनी नंतर या प्रसिद्ध जोडीच्या लग्नाची मिठाई शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी पाठवून दिली होती. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांनी पाठवलेली मिठाई त्यांना परत केली होती. या गोष्टीवरून शत्रुघ्न सिन्हा हे खूप नाराज झाले होते.

त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले होते की, ‘मला त्या लग्नामध्ये जायला काहीही रस नव्हता, नाही मला काही अपेक्षा होती, ना कसली काळजी होती. मला कोणाच्याच लग्नाला जायची कधीच हौस नसते. माझ्या लग्नाच्या वेळी पण जर मला स्वतःला अशी संधी मिळाली असती तर, मी माझ्या लग्नात पण गेलो नसतो,’ असे स्वत: प्रसारमाध्यमांना शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले होते. त्यावर त्यांनी अजून एक भाष्य केले होते की, ‘मला मिठाईची अपेक्षा अजिबात नव्हती, फक्त अमिताभ यांचा एक फोन येणे गरजेचे होते.’

भारती प्रधान यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या हवाल्याने अमिताभ आणि शत्रुघ्न यांच्यातल्या मतभेदांचा उल्लेख करत लिहिले आहे की, ‘लोक म्हणायचे की, अमिताभ आणि माझी ऑनस्क्रीन जोडी सुपरहिट आहे. मात्र, त्यांना माझ्यासोबत काम करायचे नव्हते. त्यांना वाटायचे की, ‘नसीब’, ‘काला पत्थर’, ‘शान’, ‘दोस्ताना’ यांसारख्या चित्रपटात मी त्यांच्यावर भारी पडत आहे. पण मला याने कोणताही फरक नाही पडला.’

शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या आत्मचरित्रात असे म्हटले आहे की, ‘अमिताभ बच्चन कधीही माझ्यासोबत चांगले वागत नव्हते. त्यांनी कधीही मला त्यांच्या गाडीत बसण्याची ऑफर दिली नाही. मी खूप मोठमोठे चित्रपट त्यांच्यासाठी सोडून दिले.’

सन 2014 च्या दिवाळीला जरी हे सोबत दिसले असले, तरीही त्यांच्यातले मतभेद हे कायमच बघायला मिळाले आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या ‘एनिथिंग बट खामोश’ या आत्मचरित्राचे उद्घाटन स्वत: अमिताभ बच्चन यांनीच केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ दिग्गज कलाकारांचे सुरुवातीचे वेतन ऐकूण व्हाल थक्क, अगदी शुन्यातून केली होती सुरुवात
जेव्हा शत्रुघ्न सिन्हा स्वतःच्याच लग्नात पोहचले होते उशिरा, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा

हे देखील वाचा