Thursday, June 13, 2024

‘या’ दिग्गज कलाकारांचे सुरुवातीचे वेतन ऐकून व्हाल थक्क, अगदी शुन्यातून केली होती सुरुवात

बॉलिवूडमधील अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात शुन्यातून केली होती. त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची धनदौलत नव्हती, अगदी खाण्याचे देखिल वांदे होते. अशा परिस्थितीतून पुढे येऊन त्यांनी यशाचे मोठे शिखर गाठले आहे. मात्र, त्यांना आज कोणत्याच गोष्टीची कमी नाही. म्हणतात ना की, जो जास्त यशस्वी असतो त्याच्यामागे तेवढाच खडतर प्रवास लपलेला असतो. आज आपण अशाच काही दिग्गज कलारांविषयी माहिती जाणू घेणार आहोत. ज्यांचा अंदाज त्यांच्या पहिल्या कमाइवरुन लावला जाऊ शकतो.

अमिताभ बच्चन
बॉलिवूडमधील बिग बी नावाने प्रचलित असलेले अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1969 च्या दशकात केली होती. आज त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीमध्ये एक मोलाचे स्थान निर्माण केले आहे. सध्या टेलिव्हिजवरील ‘कौन बनेगा करोडपती‘ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक करणारे बिग बी यांची पहिली पगार फक्त 500 रुपये होती. आज ते कोट्यावदीचे मालक आहेत.

नसीरुद्धीन शाह
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनात वेगळेच स्थान निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेता नसीरुद्धीन शाह (Naseeruddin Shah) यांची मोजणी बॉलिवूडमधील धमाकेदार कलाकारांमध्ये केली जाते. माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्याची पहिली पगार म्हणून फक्त 7.50 पैसे मिळायचे. आजमात्र ते कोट्यावदी संपत्तीचे मालक आहेत.

शाहरुख खान
बॉलिवूडचा किंग खान म्हणू ओळखला जाणारा अभिनेता शाहरुख खान (Shaharukh Khan) सध्या अमाप धनाचा मालक आहे. मात्र, तो अभिनय क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्याची परिस्थिती खूप गरिब होती. अभिनय क्षेत्रामध्ये त्याची पहिली पगार फक्त 50 रुपये मिळाली होती. आज अभिनेत्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. शाहरुखच्या व्रकफ्रंडबद्दल बोलायचे झाले त्याचा नुकतंच आगामी चित्रपट पठाण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खान
बॉलिवूडमधील दबंग खान नावने प्रसिद्ध झोतात असणार लोकप्रिय अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज कट्यावदी संपत्तीचा मालक आहे. मात्र, माहितानुसार भाईजानची सुरुवात 57 रुपये पगाराने झाली होती. अनेक प्रेक्षाकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान‘ आणि ‘टायगर 3‘ मध्ये पाहायला मिळमार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा शत्रुघ्न सिन्हा स्वतःच्याच लग्नात पोहचले होते उशिरा, खुद्द अभिनेत्याने केला खुलासा
पूजा मिश्राचा शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर सेक्स स्कॅमचा आरोप, म्हणाली, ‘व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी बनली स्टार’

हे देखील वाचा