बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा सध्या तिचा नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटावरून देशात सातत्याने वाद सुरू आहेत. मात्र, वादानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. अशात आज म्हणजेच गुरुवारी (दि. 11 मे)ला अदा शर्मा हिचा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी चाहते तिचे सोशल मीडियावर जोरदार अभिनंदन होत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसत आहे.
अदा शर्मा (adah sharma) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अदा शिव मंदिरात भगवान शंकरासमोर बसून प्रार्थना करताना दिसत आहे. यादरम्यान ती शिवलिंगासमोर बसून शिव तांडव पठण करत आहे. अदा पूर्ण विधीपूर्वक शिव तांडव पठण करत आहे. तिचा हा अवतार चाहत्यांना खूप आवडला आहे. अशात अदाच्या लूकबद्दल बोलायचे झाले, तर यावेळी तिने पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचा सलवार सूट घातला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना अदा शर्माने एक खास कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले, ‘माझ्या उर्जेचे रहस्य. ऊर्जा जी मला निर्बंधांचा सामना करण्यास अनुमती देते. मला तुमची बनवल्याबद्दल धन्यवाद.’ अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हिडिओवर चाहत्यांच्या सतत कमेंट्स येत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘कंगना रणाैतनंतर बॉलिवूडची दुसरी हिंदू सिंहिणी.’, तर दुसऱ्याने कमेंट करून लिहिले, ‘केरळची गोष्ट दाखवून करोडो हिंदूंचे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद.’ अशात एकाने लिहिले, ‘जास्त पूजा करण्याची गरज नाही, चित्रपट हिट झाला आहे.’ अशा सर्व प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.(bollwood actress adah sharma recites shiv tandav stotram on her 31st birthday video goes viral on social )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
निळू फुले ते राजशेखर, ‘या’ कलाकारांनी आपल्या खलनायकी भूमिकेने गाजवली मराठी सिनेसृष्टी
“केवळ अभिनयावर लक्ष दिले तर कंगनाला तोड नाही” ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याचे पंगा क्वीनबद्दल मत