मेगास्टार अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्याविरोधात सोशल मीडियावर लोक कमेंट करत तक्रार दाखल करायला सांगत आहेत. खरे तर, हे प्रकरण वाहतुकीचे नियम मोडण्याशी संबंधित आहे. कारण, काल म्हणजेच साेमवारी (दि. 15 मे)ला अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा बाईकवर बसलेले दिसले. यावेळी दोन्ही कलाकार हेल्मेटशिवाय हाेते. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी मुंबई पोलिसांना टॅग करत प्रश्न करण्यास सुरुवात केली आहे.
खरे तर, खुद्द अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांनी त्यांचा हेल्मेटशिवाय बाईकवर जाताना फाेटाे शेअर केला आहे. या व्यतिरिक्त मुंबईतील जुहूकडे जाणारा रस्ता झाडे पडल्यामुळे बंद झाला असल्याने अनुष्का बाॅडिगार्डच्या बाईकवर गेली, ज्यादरम्यान पॅपराझींने अभिनेत्रीला कॅमेऱ्यात कैद केले. सोशल मीडियावर हा फोटो समोर येताच युजर्सनी दोन्ही कलाकारांवर निशाणा साधला आहे. युजर्सने मुंबई पोलिसांकडे दोघांवर कारवाईची मागणी केली असून तक्रार नोंदवल्यास सांगितले आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते हेल्मेटशिवाय बाइकवर जाताना दिसत आहेत. या फोटोसोबत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘राइडसाठी धन्यवाद मित्रा, तुम्हाला माहीत नाही पण तुम्ही मला वेळेवर कामावर पाेहचवले, जलद आणि ट्रॅफिक जाम टाळून, धन्यवाद कॅप्ड शॉर्ट्स आणि पिवळ्या टी चे मालक. अमिताभ बच्चन यांनी त्या व्यक्तीचे आभार मानण्यासाठी पोस्ट केली. मात्र, त्यांची ही पोस्ट त्यांच्यासाठी अडचणीची ठरली आहे.
View this post on Instagram
मुंबई पोलिसांनी नेटकऱ्याना दिले उत्तर
सोशल मीडियावर मुंबई पोलिसांना टॅग करत एका युजरने कारवाईची मागणी करत लिहिले की, “दोघांनी हेल्मेट घातलेले नाही, कृपया याची नोंद घ्या.”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिले, ‘हेल्मेट नाही? या कमेंटवर उत्तर देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘आम्ही ही बाब ट्रॅफिक ब्रांचसाेबत शेअर केली आहे.'(megastar amitabh bachchan and anushka sharma ride on bike without helmet mumbai police took action)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कौतुकास्पद! ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, पोस्ट शेअर करत दिली मुलगी दत्तक घेतल्याची माहिती
तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट










