अमिताभ बच्चन हे सॊशल मीडियावरील सर्वात जास्त सक्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते सतत या माध्यमातून विविध पोस्ट्स शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमिताभ बच्चन यांच्या सर्वच पोस्ट त्यांना कमालीच्या प्रसिद्धीच्या झोतात आणतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर विशिष्ट गोष्टीच शेअर करतात असे नाही. त्यांच्या अनेक पोस्ट या मजेशीर देखील असतात. आता त्यानी शेअर केलेल्या पोस्टचेच घ्या.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा क्रिकेट खेळत आहे. हा व्हिडिओ आणि याला त्यांनी दिलेले कॅप्शन सध्या सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला आहे. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एक ४/५ वर्षाचा मुलगा हातात प्लॅस्टिकची बॅट घेऊन खेळत आहे. हा मुलगा बॅट घेईन येणाऱ्या बॉल एक शॉट मारतो. हा शॉट एखाद्या प्रशिक्षित खेळाडू सारखा होता. हा मुलगा धोनीसारखा हेलीकॉप्टर शॉट मारतो, कोहलीसारखा कव्हर ड्राइव्ह मारताना देखील दिसतो. असा हा मजेशीर व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनी शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “भारतीय क्रिकेटचे भविष्य अतिशय सुरक्षित हातांमध्ये आहे.”
याआधी देखील अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यात एक पोलीस कर्मचाऱ्याने त्याचे केस शेंडीच्या रूपात बांधले होते. तेच तो पंख्यासारखे उडवत रस्त्याने चालताना दिसत होता. हा व्हिडिओ शेअर शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते, “या गर्मीच्या दिवसांमध्ये तो त्याच्या पंख सोबत घेऊन फिरत आहे.”
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ते लवकरच ‘गणपत’, ‘घूमर’, ‘प्रोजेक्ट के’ आणि ‘बटरफ्लाई’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-