Wednesday, May 14, 2025
Home बॉलीवूड ‘अबीर गुलाल’ चित्रपटातील गाणी युट्यूब इंडियावरून हटवली, भारतात चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी

‘अबीर गुलाल’ चित्रपटातील गाणी युट्यूब इंडियावरून हटवली, भारतात चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ‘अबीर गुलाल‘ (Amir Gulal) हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर यांच्या या चित्रपटाला भारतात आधीच विरोध होत होता. दहशतवादी हल्ल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठा निर्णय घेत भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. याशिवाय या चित्रपटातील गाणीही युट्यूब इंडियावरून काढून टाकण्यात आली आहेत.

‘अबीर गुलाल’ हा चित्रपट ९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. पण भारतात त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, या चित्रपटाशी संबंधित प्रमोशनल कंटेंट देखील भारतीय व्यासपीठावरून हटवण्यात आला आहे. या चित्रपटातील ‘खुदया इश्क’ आणि ‘अंग्रेजी रंगरासिया’ ही दोन गाणीही आता युट्यूब इंडियावरून हटवण्यात आली आहेत.

मूळ गाण्याचे व्हिडिओ अ रिचर लेन्स एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसच्या अधिकृत चॅनेलवर अपलोड केले गेले होते. आता ही गाणी भारतीय प्रेक्षकांसाठी उपलब्ध नाहीत. याशिवाय, या साउंडट्रॅकचे अधिकृत हक्क धारण करणाऱ्या संगीत लेबल सारेगामानेही त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून ही गाणी काढून टाकली आहेत. तथापि, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ‘अबीर गुलाल’ चित्रपटाविरुद्धच्या निषेधाचे आवाज अधिक तीव्र झाले. वाणी कपूरला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे आणि हॅशटॅगसह तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. ‘अबीर गुलाल’ या चित्रपटाद्वारे फवाद खान ९ वर्षांनी बॉलिवूडमध्ये परतणार होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

‘अंदाज अपना अपना’ पडद्यावर धमाल करण्यास सज्ज, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
मुंबईत ‘फुले’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ टीमने बांधल्या काळ्या फिती

हे देखील वाचा