Sunday, December 15, 2024
[aioseo_breadcrumbs]

राहुल वैद्य अन् दिशा परमारचे बहुप्रतिक्षित गाणे झाले रिलीझ; तीनच दिवसात मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमारचे नवीन ‘मोस्ट अवेटेड वेडिंग लव्ह साँग’ ‘मधाणया’ रिलीझ झाले आहे. हे गाणे रिलीझ होताच सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. नुकताच या गाण्याचा ऑडिओ रिलीझ झाला होता आणि आता व्हिडिओ पाहून चाहत्यांची उत्सुकता गगनाला भिडली आहे. राहुल-दिशाच्या या गाण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘मधाणया’ गाण्याला राहुल वैद्य आणि असीस कौरने गायले आहे.

या गाण्याचे फोटोज बऱ्याच दिवसांपासून सतत लीक होत आहेत. हे पाहून चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरू केले की, राहुल आणि दिशाने गुपचूप लग्न तर नाही केले ना? पण आता गाण्याच्या निर्मात्यांनी हा सर्व गोंधळ दूर केला आहे आणि या गाण्याला खूप सुंदर पद्धतीने प्रेक्षकांच्या समोर प्रस्तुत केले आहे. गाण्याला राहूल वैद्य आणि दिशा परमारने इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत लाईव्ह येऊन रिलीझ केले. हे गाणे देसी म्युझिक फॅक्टरी या यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले आहे. या गाण्याला तीनच दिवसात १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

रिलीझ करण्यावेळी, दिशा परमार गाण्यामध्येच हरवून गेली. ती त्या सीनकडे खुणावत म्हणाली, ज्याला राहुल वैद्य गाण्यातून काढू इच्छित होता. दिशा म्हणाली, तो तीचा आवडता सीन आहे. हा तो सीन आहे, ज्यामध्ये नवरी दिशाला कारमधून आणताना राहुल तिच्या गालावर किस करत आहे.

गाण्यामध्ये दाखविले आहे की, कशाप्रकारे एका मुलीचे आई वडील तिच्यासाठी मुलगा शोधत आहेत आणि लग्नाच्यावेळी तिला राणीसारखे विदा करत आहेत. त्यावेळी सासर आणि नवऱ्याच्या घराविषयी तिच्या मनात वेगवेगळे विचार सुरू आहेत. त्या वेळेच्या या सुख-दुःखाच्या वातावरणाला गाण्यामध्ये खूप सुंदररीतीने रचले गेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मातीशी नाळ जोडलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वांसमोर केला बिहारचा ‘लौंडा’ डान्स, ‘द कपिल शर्मा शो’मधील व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ

-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश

हे देखील वाचा