‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेत्री मंदाकिनी तुम्हाला आठवत असेलच. या अभिनेत्रीने आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली होती. मात्र, अचानक मंदाकिनी चित्रपट सृष्टीतून गायब झाली. बर्याच दिवसांनी कळल की, अभिनेत्री मंदाकिनीचे लग्न झाले आहे. ती तिच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवत आहे. आता मंदाकिनी प्रसिद्धीपासून दूर राहून तिचे साधे जीवन जगते.
नुकतीच मंदाकिनीने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये तिच्यासोबत संगीता बिजलानी आणि वर्ष उसगावकरही दिसल्या होत्या. शोदरम्यान मंदाकिनीने एक मोठा खुलासा केला होता. अभिनेत्री मंदाकिनीने यावेळी अनेक गोष्टी सांगितल्या.
View this post on Instagram
मंदाकिनीच्या वडिलांनी तिला गोळ्या घातल्या होत्या,अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. त्याबद्दल बोलताना मंदाकिनी म्हणाली की, ‘माझ्या वडिलांनी मला गोळी मारल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मी सेटवर पोहोचल्यानंतर सगळे माझ्या जवळ येत होते. मला लोक विचारत होते की, मी ठीक आहे का? ते सगळे माझी इतकी काळजी का करत होते, हे मला कळले नाही. तेव्हा क्षणभर मलाही आश्चर्य वाटलं की काय झालं. पण खूप दिवसांनी मला ही अफवा पसरल्याचे समजल.”
राज कपूर दिग्दर्शित चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली’ची अभिनेत्री मंदाकिनी रातोरात स्टार झाली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून मंदाकिनीचे नशीब उजळले होते. 1985 मध्ये आलेला या चित्रपटनंतर मंदाकिनीच्या करिअरमध्ये मोठा बदल झाला.
दरम्यान, कॉमेडियन कपिल शर्मा यशाच्या पायऱ्या चढत आहे. 8 जुलै 2023 रोजी कपिल शर्मा आणि त्यांची टीम अमेरिकेला रवाना होणार आहे. त्यामुळे हा शो बंद होणार असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. याविषयी बोलताना कपिल शर्मा म्हणाला की,अजून याबाबत काहीही निश्चित झालेले नाही.










