Friday, September 6, 2024
Home कॅलेंडर चतुरस्त्र नट हरपला! अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा

चतुरस्त्र नट हरपला! अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा

मराठीतील ज्येष्ठ कलाकार, एक चुरस्त्र अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मात्र मुंबईतच झाला होता. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झाले होते.

किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्यामुळे घरातील वातावरणातच नांदलस्कर यांनाही अभिनयाचं वेड त्यांना लागले होते.

नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले होते. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.

नांदलस्कर यांच्या जाण्याने एक जाणता कलाकार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा