‘बिग बॉस’ तमिळ फेम साक्षी अग्रवाल केवळ दक्षिण सिनेमातच नव्हे, तर हिंदी सिनेमातीलही एक सुप्रसिद्ध नाव बनली आहे. तिच्या बोल्ड फोटोंसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते. परंतु यावेळी तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पूर्णपणे वेगळा आहे. यात ती एका वेगळ्याच मूडमध्ये दिसली आहे. आधी ती जोर जोरात रडताना दिसली आणि मग अचानक ती रागाने लाल झाली.
हा व्हिडिओ साक्षीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्यात तिने ऍक्टिंग चॅलेंज स्वीकारले आहे. ती सांगत आहे की, ती वेगवेगळ्या मूड्सवर तिचे एक्सप्रेशन्स किती लवकर बदलू शकते. कधी राग, कधी दुःख, तर कधी भीती दाखवत, ती तिचे टॅलेंट दाखवत आहे.
इंस्टाग्रामवर तिला १.४ दशलक्ष युजर फॉलो करतात, जे तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक करण्यास कंटाळत नाहीत. या व्हिडिओवर अल्पावधीतच हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. चाहते म्हणत आहेत की, ‘ग्लॅमर असो फिटनेस असो वा अभिनय, तू सर्वांना मागे सोडले आहेस.’
साक्षी अग्रवालला ‘बिग बॉस’ तमिळ ३ मधून खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती यशाची शिडी चढतच राहिली. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या वर्कआउटचे व्हिडिओही चांगलेच पसंत केले जातात. ती तिच्या चाहत्यांसाठी तिच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते.
अलीकडेच साक्षीचा हॉरर-थ्रिलर चित्रपट ‘द नाईट’ची शूटिंग सुरू झाली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन तिने याबाबत माहिती दिली. हा चित्रपट हनीमूनसाठी जाणाऱ्या एका जोडप्याची कहाणी आहे. या चित्रपटात साक्षी स्टंट सीनही करत असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यासाठी ती प्रशिक्षण घेत आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी या तीन भाषांमध्ये बनवला जात आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना बराच सस्पेन्स आणि थ्रिलर पाहायला मिळणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-याला म्हणतात अष्टपैलू कलाकार! नवाजुद्दीन सिद्दिकीने हातात चुडिया घालत गायलेय हटके गाणे
-बेदर्द निकले वो! प्रेमात धोका झालेल्या प्रत्येकानेच पाहायला हवं, असंय हिना खान नवकोरं गाणं ‘बेदर्द’