टेलिव्हिजनवरील आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान. ती नेहमीच तिच्या स्टाइलमुळे आणि अंदाजामुळे सर्वत्र प्रसिद्ध असते. हिना खान ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिचे स्टाइलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांशी कायम संपर्कात असते. पण आता हिना खान तिच्या फोटोमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हिना खानचा नुकताच एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. तिचा हा व्हिडीओ सगळ्यांना खूपच आवडला आहे.
हिनाच्या प्रदर्शित झालेल्या या म्युझिक व्हिडिओचे नाव ‘बेदर्द’ हे आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिना एका नवरीच्या रूपात दिसत आहे. या रूपात ती खूपच सुंदर दिसत आहे. या गाण्याचे बोल संजय चतुर्वेदी यांनी लिहिले आहे. तर स्टेबिन बेन याने हे गाणे गायले आहे. या गाण्याला पॉकेट एफएमवरील युट्युब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. आतापर्यंत या गाण्याने युट्युबवर धुमाकूळ घातला आहे. हे गाणे सध्याचे सगळ्यात टॉपचे ट्रेंडींग सॉंग झाले आहे.
या गाण्याला प्रदर्शित होऊन केवळ चारच दिवस झाले आहेत आणि या गाण्याला आत्तापर्यंत पंधरा लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच 300 हजार लाइक्स मिळाले आहेत. या गाण्यातील हिनाचा लूक प्रेक्षकांना खूपच आवडला आहे. तसेच तिचे सगळे चाहते तिच्या व्हिडिओला लाईक करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत. हिना खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत काम केले होते. तसेच ती बिग बॉस या शोमध्ये देखील आली होती.