Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड कंगनाने लग्नाच्या प्रश्नावर साेडले मौन; म्हणाली, “मला लग्न करायचे आहे, पण…’

कंगनाने लग्नाच्या प्रश्नावर साेडले मौन; म्हणाली, “मला लग्न करायचे आहे, पण…’

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘टिकू वेड्स शेरू‘ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये निर्माती म्हणून व्यस्त आहे. कंगना सध्या चित्रपटाची स्टारकास्ट नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्यासह विविध ठिकाणी पोहोचून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. अशात एका मुलाखतीदरम्यान कंगनाने तिच्या लग्नाबाबत मौन साेडले आहे. नेमके काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

‘टिकू वेड्स शेरू’च्या प्रमोशनशी संबंधित कंगना राणौत (kangana ranaut) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये कंगना राणौतला विचरण्यात आले की, “मॅडम, तुमचं लग्न कधी होणार आहे?’ की, तुम्हीही सलमान भाईला फॉलो करत आहात? या प्रश्‍नावर कंगना खळखळून हसायला लागली आणि उत्तर देत म्हणाली, ‘बघा, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ माझ्या आयुष्यात येणार असेल तर तीही येईल.” यानंतर कंगनाला प्रश्न विचारला जातो की, ‘तुम्हाला लग्न करायचे नाही का?’ यावर कंगना म्हणते, “मला लग्न करायचे आहे, एक कुटुंब करायचे आहे. मात्र, मी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. योग्य वेळ आल्यावर ते होईल.”

कंगना राणौत निर्मित ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याला चाहत्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना राणौतच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच ‘इमर्जन्सी’ या पीरियड ड्रामामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगना दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अशात चित्रपटात अभिनेत्रीशिवाय अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि महिमा चौधरीसारखे स्टार्स आहेत. इतकेच नाही, तर कंगना ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटाबाबतही चांगलीच चर्चेत आहे. मात्र, ती यात दिसणार की नाही, याबाबत अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही.(bollywood actress kangana ranaut talked about her marriage plans during promoting her upcoming production tiku weds sheru )

अधिक वाचा-
‘इमली’ने वडिलांच्या लग्नात लावली हाताला मेहंदी; जाणून घ्या अभिनेत्रीची हाेणारी आई आहे तरी काेण?
बॉलीवूडमधील भेदभावावर प्रियांकानंतर तापसी पन्नूने साेडले मौन; म्हणाली, ‘लोकांची निष्ठा…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा