Friday, December 1, 2023

‘इमली’ने वडिलांच्या लग्नात लावली हाताला मेहंदी; जाणून घ्या अभिनेत्रीची हाेणारी आई आहे तरी काेण?

टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. ‘इमली‘ अभिनेत्रीला ‘बिग बॉस 16‘ मधून खूप प्रसिद्धी मिळाली. अशात सध्या सुंबूल तिचे वडील तौकीर खान यांचे दुसरे लग्न एन्जाॅय करताना दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो देखील शेअर केले आहेत, जे साेशल मीडियावर चांगलेच व्हायरल हाेत आहे.

स्टार प्लस वाहिणीवरील प्रसिद्ध मालिका ‘इमली’ आणि सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ मधून प्रसिद्धी मिळवणारी सुंबुल तौकीर खान (sumbul touqueer) तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल खूप उत्सुक आहे. तिचे वडील तौकीर खान यांच्या लग्नाचे कार्यक्रम अभिनेत्रीच्या घरी सुरू झाले आहेत. त्याचबरोबर सुंबुलच्या वडिलांच्या मेहंदी साेहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes TV (@etimes_tv)

अशात सुंबुलने आपल्या इन्स्टा स्टोरीवर वडिलांच्या मेहंदी साेहळ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, गडद गुलाबी रंगाच्या सूटसह पांढरी सलवार आणि दुपट्टा परिधान केलेली सुंबुल सुंदर दिसत असून ती मेंदी लावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुंबुलच्या घरात अनेक पाहुणे देखील दिसत आहेत आणि तिचे घर पूर्णपणे सजलेले आहे.

मंडळी, ‘बिग बॉस सीझन 16’मध्ये साजिद खानने सुंबुलच्या वडिलाच्या दुसऱ्या लग्नाचा उल्लेख केला होता. इमली विचारण्यात आले हाेते की, जर तिच्या वडिलांना 22 वर्षांच्या मुलीशी लग्न करायचे असेल तर तिची प्रतिक्रिया काय असेल. यावर अभिनेत्रीने तिला कोणतीही अडचण नसल्याचं म्हटलं होतं.(tv actress sumbul touqueer celebrates mehndi night with family as her father touqeer khan set to get married again)

अधिक वाचा-
फुटबॉलपटू बाबू बेमिसाल! ‘चिडियाखाना’मधील ‘हा’ छोटा खलनायक मिळवतोय प्रेक्षकांची दाद
‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीनं ‘आदिपुरुष’मध्ये साकारली शूर्पणखाची भूमिका; म्हणाली…

हे देखील वाचा