बाॅलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्रील म्हणजे कंगना रणौत होय. कंगना तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा बिनधास्त व्यक्तव्यांमुळे जास्त चर्चेत असते. कंगना एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक बेधडक आणि स्पष्टवक्ता स्त्री देखील आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच तिचे मत मांडत असते. कंगना सोशल मीडियावर नेहमीत सक्रिय असते. सध्या कंगनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमातकूळ घालत आहे.
कंगना तिच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता कंगना राणौतबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकताच कंगना राणौतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कंगना तिच्या लग्नाची पत्रिका पापाराझींना देताना दिसत आहे.
कंगना कारमध्ये बसलेली व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सजवलेल्या घराबाहेर एक रिपोर्टर रिपोर्टिंग करताना दिसत आहे. यानंतर कंगना कारमधून येताना दिसत आहे. तेथील मीडिया तिला घेरतो आणि तिची चौकशी करू लागतो.
View this post on Instagram
या व्हिडिओमध्ये रिपोर्टर कंगनाला म्हणाला की, मॅम तुम्ही खरच लग्न करणार आहे का? मग कंगना रनौत मागून एका कारमध्ये एन्ट्री करते. तेव्हा कंगनाला सर्वजण विचारतात की “लग्नाची चर्चा खरी आहे का?” त्यावर कंगना लग्नाची पत्रिका देताना म्हणते, “तुम्ही लोक बातम्या पसरवता, मी फक्त चांगली बातमी देते. तुम्ही सगळे नक्की या. ”
कंगनाच्या या व्हिडिओवर नेटकरी खूप कमेंट करत आहेत. एका युजरने लिहीले की, ‘अखेर टीकू वेड्स शेरू येणार’, दुसऱ्याने लिहीले की,‘येणार आहे आपली टीकू’. तर काहीजण ती अगामी चित्रपटाच प्रोमोशन करत आहे असे म्हणत आहेत. ‘टिकू वेड्स शेरू’ चे दिग्दर्शन साई कबीर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती कंगना राणौतने केली आहे. हा चित्रपट 23 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. (Actress Kangana Ranaut’s video viral on social media)
अधिक वाचा-
–डान्सर गौतमी पाटील चर्चेत, माय-लेकीचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल
–“…त्या दिवसापासून दारू अशी सुटली” अभिनेते किरण माने यांची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल