Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड क्रितीला अभिनयाच्या दुनियेत एंट्री करताना ऐकाव्या लागल्या ‘या’ गोष्टी; स्टार किड्सने हिसकावली अभिनेत्रीची जागा

क्रितीला अभिनयाच्या दुनियेत एंट्री करताना ऐकाव्या लागल्या ‘या’ गोष्टी; स्टार किड्सने हिसकावली अभिनेत्रीची जागा

अभिनेत्री क्रिती सेनन आज चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. ती बिग बजेट चित्रपट करत आहे. तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. मात्र, बाहेरची व्यक्ती असल्याने या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. अशात क्रितीचा एक जुना व्हिडिओ व्हायरल हाेत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे.

अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) म्हणाली, ‘जेव्हा मी इंडस्ट्रीत येण्याचा विचार केला, तेव्हा माझ्या नातेवाईकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, मला वाटत नाही की हे चालेल. हे एक मोठे स्वप्न हाेते. इंडस्ट्री चांगली नाहीत. धडपडणारे बरेच लोक आहेत. तुझे लग्न लवकर होणार नाही.’ याशिवाय क्रितीने सांगितले की, ‘जेव्हा मी मुंबईत आले, तेव्हा मी हरवले होते. मला काहीच कळत नव्हते. मी कोणालाच ओळखत नव्हते. सुरुवात कशी करावी हेच कळत नव्हते. कोणाशी संपर्क साधावा मी कोणाकडे जाऊ? काहीही कल्पना नव्हती.’

क्रिती आपला मुद्दा पुढे करत म्हणाली, ‘जर मी फिल्मी कुटुंबातून आले असते, तर कदाचित ते लोक मला आधीच ओळखत असते. मी त्यांना आधी कुठेतरी भेटले असते. अनेकवेळा असे व्हायचे की, भूमिका भेटणारचं हाेती की ती दुसऱ्या प्रसिद्ध कलाकाराला मिळायचे. स्टारकिड्समुळे माझी जागा चित्रपटांमधून घेतली गेली आहे. मात्र, त्यामागचे कारण मला माहीत नाही. यामुळे माझी थोडी चिडचिडही होते असे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti (@kritisanon)

क्रिती शेवटची ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने सीतेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाबाबत बरेच वादही झाले होते, ज्यामुळे कलाकरांना ट्राेलिंगचा सामना करावा लागला.(bollywood actress kriti sanon struggle life initial days was replaced in movie because of starkids)

अधिक वाचा-
तमन्ना भाटियाने पॅपराझींनसाेबत केला ‘कावाला’ गाण्यावर डान्स, अभिनेत्रीचे मूव्ह पाहून चाहते झाले वेडे
मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यास घाबरायचे लोक, राजेश खन्नांपेक्षाही घ्यायचे जास्त मानधन, ‘असा’ होता दरारा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा