Tuesday, May 28, 2024

बापरे! चित्रपट फ्लॉप झाला की क्रिती सेनन करते ‘हे’ काम, स्वतःच केला मोठा खुलासा

बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली क्रिती सेनन (Kriti Senon) आज तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. इंजिनीअरिंगमधून मॉडेलिंग आणि त्यानंतर अभिनयात आलेल्या क्रितीला इंडस्ट्रीची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. स्वत:च्या जोरावर तिने करिअर घडवले आहे. तिच्या शॉर्ट फिल्म करिअरमध्ये क्रितीने हिरोपंती, बरेली की बर्फी, लुका छुपी आणि दिलवाले सारखे हिट चित्रपट दिले आहेत. पण यासोबतच क्रितीच्या काही चित्रपटांचा परफॉर्मन्स खास नव्हता. क्रितीने बच्चन पांडेसाठी खूप मेहनत घेतली पण हा चित्रपट काही खास करिष्मा दाखवू शकला नाही.

‘बच्चन पांडे’ चित्रपट जोरदार आपटल्यानंतर क्रिती सेननला खूपच वाईट वाटले होते. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, “इतक्या मेहनतीनंतरही चित्रपट चांगले काम करत नाहीत तेव्हा तिला कसे वाटते आणि हा आघात तिला कसा सहन करावा लागतो’. क्रितीने सांगितले की, ‘बच्चन पांडे’ फ्लॉप झाल्यानंतर मी खूप दुःखी होते, खूप रडले होते. सामान्य माणूस जे करतो ते सर्व मी केले.मी पडद्यावर आणि मुलाखतींमध्ये खूप मजबूत दिसत असले तरी, जेव्हा मला रडावं लागतं तेव्हा मी रडते, जेव्हा मला कोणाशीही बोलावंसं वाटत नाही तेव्हा मी बोलत नाही. मला वाटते की तुमच्या भावनांनाही सामोरे जाणे खूप महत्वाचे आहे.”

तसेच क्रितीने सांगितले की, “जेव्हा ती लहान होती तेव्हा ती तिच्या वाढदिवसासाठी खूप उत्सुक असायची. तिला सरप्राईज पाहायची आवड होती. पण आता तिला वाढदिवसाच्या नियोजनाचा कोणताही ताण घ्यायचा नाही. वाढदिवसाचा दिवस खूपच ओव्हररेट केलेला वाटतो. तिच्या वाढदिवशी ती कोणतीही योजना करत नाही.”

दरम्यान, 2014 मध्ये तिने सुपरस्टार महेश बाबूच्या विरुद्ध तेलगू सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट नेनोक्कडाइनमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याचवेळी बॉलिवूडमध्ये तिचा पहिला चित्रपट ‘हिरोपंती’ वर्षी प्रदर्शित झाला. ज्यामध्ये ती टायगर श्रॉफसोबत दिसली होती. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आज क्रिती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

हे देखील वाचा