Friday, September 20, 2024
Home कॅलेंडर मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यास घाबरायचे लोक, राजेश खन्नांपेक्षाही घ्यायचे जास्त मानधन, ‘असा’ होता दरारा

मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यास घाबरायचे लोक, राजेश खन्नांपेक्षाही घ्यायचे जास्त मानधन, ‘असा’ होता दरारा

लोकं येतात, लोकं जातात. परंतु त्यांच्या आठवणी कायम राहतात. अगदी असंच काहीसं घडलंय ते बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ‘प्राण कृष्ण सिकंद’ यांच्याबाबत. ते ‘प्राण साहेब’ या नावानेही ओळखले जातात. त्यांनी 350 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार 2013 आणि पद्म भूषण 2001 यांचाही समावेश आहे. त्यांना त्यांच्या खलनायकी आणि रूबाबदार अंदाजासाठी ओळखले जायचे. चित्रपटात काम करताना भूमिकांना ते नेहमीच वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करायचे. त्यांनी सन 1940 ते 1990 दशकापर्यंत चाहत्यांना आपल्या दमदार अभिनयाने आपल्या प्रेमात पाडले होते.  बुधवारी(दि. 12जुलै) त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टींबाबत जाणून घेणार आहोत.

श्रीमंत कुटुंबात झाला होता जन्म
प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी, 1920 रोजी दिल्लीच्या बल्लीमारनच्या एका खानदानी श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील केवल कृष्ण सिकंद ब्रिटीश काळातील सरकारी ठेकेदार होते. ते सरकारी इमारती, रस्ते आणि पुल निर्माणामध्ये पारंगत होते. जिथेही सरकारला अशा कामांची गरज असायची, तेव्हा ते नक्कीच कृष्ण सिकंद यांच्याकडे जात असायचे. या कुटुंबाची प्रतिष्ठा बल्लीमारनच्या गल्लीपर्यंतच नव्हती, तर पूर्ण दिल्लीमध्ये होती. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती.

बनायचे होते फोटोग्राफर पण बनले अभिनेता
प्राण हे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. चाहत्यांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्राण यांना अभिनेता नाही, तर एक फोटोग्राफर बनायचे होते. त्यांना फोटोग्राफीची खूप आवड होती. ते जिथे जायचे, तिथे ते फोटो काढण्यात व्यस्त असायचे.

परंतु त्यांच्या नशिबात वेगळेच लिहिले होते, त्यामुळे ते फोटोग्राफर बनण्याऐवजी अभिनेता बनले. अभिनयाच्या दुनियेत त्यांचे कोणाशीही नाते नव्हते. परंतु त्यांनी आपल्यावर प्रेम करण्यास भाग पाडले. त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्याबद्दल कधीच विचार केला नव्हता. परंतु चित्रपटांनीच त्यांची एक वेगळी ओळख बनवली. प्राण यांना फुटबॉल खेळण्याचीही आवड होती. ते आपला मोकळा वेळ खेळण्यात घालवायचे.

‘खानदान’ चित्रपटातून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण
प्राण यांनी अधिकतर हिंदी सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. परंतु त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेने हीरोच्या भूमिकेपेक्षा अधिक नाव कमावले. प्राण यांनी सन 1940मध्ये पंजाबी सिनेम ‘यमला जट’मधून आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सन 1942 साली ‘खानदान’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांची अभिनेत्री नूरजहां होती. प्राण यांनी 18 एप्रिल, 1945 रोजी शुक्ला आहलुवालियाशी लग्न केले होते. त्यांनी 3 अपत्य आहेत. त्यामध्ये 2 मुले अरविंद, सुनील आणि 1 मुलगी पिंकी यांचा समावेश आहे.

राजेश खन्ना यांच्यापेक्षा अधिक मानधन कमावणारा अभिनेता
ज्या सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला त्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारे अभिनेता होते. तसेच ते राजेश खन्ना यांच्यापेक्षा जास्त मानधन मिळवणारे एकमेव अभिनेता होते. उत्पादन खर्चात होणारी दरवाढ टाळण्यासाठी उत्पादकांनी 60 आणि 70च्या दशकात या जोडीला एकत्र आणले नाही, हे बर्‍याचदा पाहण्यात आले आहे.

जेव्हा मुलांचे नाव प्राण ठेवण्यास घाबरू लागले होते लोक
प्राण यांचे नाव त्या अभिनेत्यांमध्ये येते, जे पडद्यावर प्रत्येक भूमिका जिंकून घ्यायचे. असे म्हटले जाते की, पडद्यावर त्यांच्या उपस्थितीची प्रेक्षकांच्या मनात भीती होती आणि या भीतीमुळेच त्यांनी आपल्या मुलांचे नाव प्राण ठेवणे सोडले होते. प्राण यांनी खलनायकी भूमिकाही अशाप्रकारे साकारल्या की, खऱ्या आयुष्यातही त्यांना लोक घाबरू लागले होते. एकीकडे त्यांनी चाहत्यांना घाबरवले, तर दुसरीकडे मात्र त्यांनी उपकारचे मंगल चाचा, जंजीरचे शेर खान आणि गुलजारच्या परिचयमध्ये प्रेमळ आजोबांची भूमिका साकारली, जी चाहत्यांना खूपच भावली होती.

जेव्हा मित्राची बहीण म्हणाली, ‘गुंड्याला घरी का आणतो’
एकदा प्राण दिल्लीतील आपल्या मित्राच्या घरी चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी मित्राची लहान बहीण कॉलेजवरून घरी आली, तेव्हा मित्राने प्राणसोबत तिची ओळख करून दिली. त्यानंतर प्राण जेव्हा हॉटेलमध्ये परतले, तेव्हा मित्राने त्यांना फोन केला आणि बहिणीने जे काही म्हटले होते ते सांगितले. तो म्हणाला की, ‘बहीण म्हणत होती की, गुंड्याला घरी कशाला घेऊन येत असतो.’ प्राण आपली भूमिका इतक्या जबरदस्त आणि उत्तमरीत्या साकारायचे की, लोक त्यांना खऱ्या आयुष्यातही गुंडाच समजायचे.(pran villains charge more than heroes ever wanted to become photographers)

अधिक वाचा-
प्राण यांच्यासोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची आलेली वेळ, बरं-वाईट होण्याच्या भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री
गंमती गंमतीत झाले वांदे! प्राण यांनी अभिनेत्रीला अचानक खेचलेले पाण्यात, घाबरून तिनेही उचललेलं मोठं पाऊल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा