Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृतीमुळे अभिनेते मेहमूद झाले होते आपल्याच मानसपुत्रावर नाराज, स्वतःच केला होता खुलासा

बॉलिवूडमध्ये नेहमीच अशा काही घटना झाल्या आहेत, जिथे काही मित्र अचानक अनोळखी झाले, काही नाते अचानक संपुष्टात आले. याला कदाचित नेम, फेम मनी आदी गोष्टी जबाबदार असतील मात्र या गोष्टींमुळे नाते, मैत्री विसरणार कलाकार लोकांच्या नजरेत पडले. या यादीमध्ये अनेक मोठमोठे कलाकार आहेत. दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचा देखील या यादीत समावेश असावा हे निव्वळ दुर्दैव. महानायक अमिताभ बच्चन हे आज संपूर्ण सिनेसृष्टीवर राज्य करतात. आज त्यांच्याकडे काय नाही असे काहीच नाही. मात्र हे जरी आता दिसत असले तरी जेव्हा त्यांनी सुरुवात केली, तेव्हा चित्र काही औरच होते. अमिताभ यांना त्यांच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळात अनेकांनी मदत केली आणि ते आज इथवर आले. यातले एक महत्वाचे नाव म्हणजे मेहमूद.

आपल्या विनोदाने आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या मेहमूद यांनी केवळ अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील नावलौकिक मिळवला होता. मेहमूद यांनी त्यांच्या कॉनेमासाठी नवख्या अमिताभ यांना अरुण इराणी यांच्या सोबत कास्ट केले. बोम्बे टू गोवा हा सिनेमा हिट झाला, आणि याचा अमिताभ यांच्या करियरला मोठा आधार मिळाला. मेहमूद यांनी अमिताभ यांना आपला मुलगाच मानले होते, ते त्यांना अमित म्हणून हाक मारायचे. मेहमूद यांनी त्यांच्या काळात अनेकांना मदत केली होती. मात्र जेव्हा त्यांचा वाईट काळ सुरु झाला, त्यांना सिनेमे मिळत नव्हते, फेम निघून गेले होते तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांची कोणतीच मदत केली नाही. यावर एका मुलाखतीमध्ये मेहमूद यांनी सांगितले होते, “आता असा काळ आला आहे, ज्याला मी काम दिले, त्याच्याकडे मला काम मागण्याची वेळ आली आहे. मात्र मी असे करणार नाही. कारण मलाच स्वतःची लाज वाटेल.”

मेहमूद यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितले की, त्यांनी अमिताभ बच्चन यांना अनेक चित्रपटांमध्ये काम मिळून दिले, स्वतःच्या घरात सिनेमे दाखवले. त्यांनी पुढे सांगितले जेव्हा अमिताभ बच्चन यांचे वडील घरात पडले होते, तेव्हा मेहमूद त्यांना पाहायला गेले. मात्र एका आठवड्याने मेहमूद यांची बायपास झाली. तेव्हा अमिताभ वडिलांसोबत त्याच हॉस्पिटलमध्ये येऊनही मेहमूद यांना भेटले नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटले होते.

अधिक वाचा- 
बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत

हे देखील वाचा