कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत प्रचंड प्रसिद्धी मिळवली. त्यांनी अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. त्यापैकीच एक म्हणजे अक्षय कुमार होय. आज देसाई आपल्यात नाहीयेत. त्यांनी बुधवारी (दि. 02 ऑगस्ट) मुंबईच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्म’हत्या केली. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडला धक्का बसला आहे. अशात अक्षय कुमार यानेही मोठे पाऊल उचलले आहे. अक्षयने त्याचा आगामी ‘ओएमजी 2’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. खरं तर, 2 ऑगस्ट रोजीच सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार होता.
अक्षय कुमारने केले ट्वीट
अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘ओएमजी 2’ (OMG 2) सिनेमाचा ट्रेलर 2 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर रिलीज केला जाणार होता. मात्र, आता ट्रेलरच्या रिलीजची तारीख पुढे ढखलण्यात आली आहे. अक्षयने ट्वीट करत लिहिले आहे की, “नितीन देसाईंच्या निधनाबाबत समजताच दु:ख झाले आणि यावर विश्वास बसत नाहीये. ते प्रॉडक्शन डिझाईनचे दिग्गज होते आणि आपल्या सिनेसृष्टीचा मोठा भाग होते.”
Unbelievably sad to know about the demise of Nitin Desai. He was a stalwart in production design and such a big part of our cinema fraternity. He worked on so many of my films… this is a huge loss. Out of respect, we are not releasing the OMG 2 trailer today. Will launch it…
— Akshay Kumar (@akshaykumar) August 2, 2023
ट्रेलर कधी होणार रिलीज?
अक्षयने पुढे असेही लिहिले की, “त्यांनी माझ्या अनेक सिनेमांवर काम केले होते. हे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या सन्मानात आम्ही आज ओएमजी 2चा ट्रेलर रिलीज करणार नाही. सिनेमाचा ट्रेलर उद्या सकाळी 11 वाजता लाँच केला जाईल. ओम शांती.” खरं तर, अक्षय कुमार याचा हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा ‘ओएमजी- ओह माय गॉड’ या सिनेमाचा सीक्वेल आहे.
स्टुडिओमध्ये आढळला मृतदेह
नितीन देसाई यांचा मृतदेह मुंबईजवळील कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला. त्यांच्या निधनाने कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, देसाईंना त्यांच्या सिनेमांसाठी 4 वेळा कला दिग्दर्शनासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, ‘लगान’, ‘स्वदेस’ आणि ‘देवदास’ यांसारख्या सिनेमांमधील त्यांच्या कामाला पसंती मिळाली. (superstar akshay kumar postpones omg 2 trailer release as mark of respect to late bollywood art director nitin desai)
हेही वाचा-
Suicide: 252 कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबले होते नितीन देसाई, विनोद तावडेंनी दिलेला ‘हा’ सल्ला
‘तू इतकी टोकाची भूमिका का घेतलीस…’, नितीन देसाईंच्या निधनावर हळहळला सुबोध भावे
मराठी दिग्दर्शकाची आत्म’हत्या, चित्रपटसृष्टीवर शोककळा