Monday, October 2, 2023

‘ओह माय गॉड 2’ चित्रपटाच दुसरं गाणं रिलीज, पाहायला मिळाले अक्षयचे ‘महादेव’ रूप

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्ध मिळवली आहे. त्याने सिनेसृष्टीला एका पेक्षा एक अनेक हिट चित्रपट दिले आहे. अक्षयची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अक्षयचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयचा ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटात अक्षयने दमदार भूमिका साकारली आहे. त्याच्या या चित्रपटातील दुसरे गाणं नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची उसुक्ता वाढली होती. त्यानंतर आता या चित्रपटातील दसर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आहे. आता नुकतेच शिवभक्तीचे चित्रण करणारे ‘ओह माय गॉड 2‘ चे दुसरे ‘हर-हर महादेव’ गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात अक्षय कुमार (Akshay Kumar)  शिव तांडव करताना दिसत आहे.

या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हे गाण प्रेक्षकांमध्ये चांगलेच चर्चेत आले आहे. यापूर्वी अक्षय कुमारने ‘ओह माय गॉड-2’ या चित्रपटाच्या दुसऱ्या गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. ज्याबद्दल अक्षयने सांगितले होते की, त्याचे ‘हर-हर महादेव’ हे गाणे 27 तारखेला प्रदर्शित होणार आहे . हे गाणे अखेर प्रेक्षकांसमोर आले आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय महादेवांच्या रूपात दिसत आहे. त्याच्या हातात ढोल दिसत आहे. त्याच्या मोठमोठ्या जटा दिसत आहेत. इतकच नाही तर तो त्या गाण्यावर डान्स देखील करत आहे. भोलेनाथांना समर्पित या गाण्याचे बोल तर आकर्षक आहेतच, पण त्याचबरोबर अक्षयने या गाण्यात शिवतांडव करताना शंकराचे रूप ज्या पद्धतीने दाखवले आहे तेही खूप सुंदर आहे.

‘हर हर महादेव’ हे श्रावन महिन्यात भगवान भोलेनाथांना समर्पित केलेल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. ‘हर हर महादेव’ हे गाणे विक्रम माँट्रोज यांनी गायले आहे. या गाण्याचे बोल शेखर अस्तित्व यांनी लिहिले आहेत. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘ओह माय गॉड 2’ हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Actor Akshay Kumar’s Oh My God 2 movie Dussehra song release)

अधिक वाचा- 
चक्क अमिताभ बच्चन महिलांच्या अंतर्वस्त्रावर ट्वीट करत विचारला एक प्रश्न, नेटकरी म्हणाले, “केबीसीमध्ये विचारा”
साडी नेसून रस्त्यावर भीक मागतोय ‘हा’ अभिनेता? कारण वाचून व्हाल थक्क

हे देखील वाचा