Monday, December 30, 2024
Home बॉलीवूड “त्यांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा..” सावत्र आई हेलनबद्दल अरबाज खानचा मोठा गौप्यस्फोट

“त्यांनी आमच्या कुटुंबात फूट पाडण्याचा..” सावत्र आई हेलनबद्दल अरबाज खानचा मोठा गौप्यस्फोट

प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि लेखक सलीम खान यांना आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये दिलेल्या योगदानाने त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. विशेष म्हणजे, ते त्यांच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही भलतेच चर्चेत असतात. सलीम यानी सन 1981मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री हेलेन यांच्यासोबत दुसरे लग्न केले होते. त्यावेळी सलीम खान यांचे आधीच पहिले लग्न झालेले होते. ते सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा खान यांचे वडील होते.

पहिल लग्न झालेल असतानाही ते हेलेनला घरी घेऊन गेले. त्यावेळी हाच मोठा प्रश्न होता की, त्यांचे कुटुंब हेलेनचा स्वीकार करेल की नाही. परंतु सलीम (Salim Khan)यांच्या कुटु्ंबातील सदस्यांनी हेलेनचा फक्त स्वीकारच केला, नाही तर ते आनंदाने राहत आहेत. काही दिवसांपूर्वीच अरबाजने हेलेन आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल सांगितले. त्यावेळी तो म्हणाला की, सलीम यांनी हेलेनला त्यांच्यावरती थोपवले नाही आणि प्रत्येक निर्णय समजदारीने घेतला.

माध्यमांशी बोलताना अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणाला की, “हेलेन यांनी कधीच आम्हाला वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना चांगलंच माहिती होतं की, या मुलांना आईची खूप गरज आहे. हेलेन यांनी कधीच आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांच्या आयुष्यात कुणी तरी आहे आणि आयुष्यभर राहील, याच गोष्टीमुळे त्या आनंदी असायच्या. त्यांना माहिती होतं की, सलीम यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि मुले आहेत.”

अरबाज पुढे बोलताना म्हणाला की, “माझ्या आईसाठी या गोष्टींचा स्वीकार करणे फार कठीण होते. ज्याप्रकारे आमचं कुटुंब त्या परिस्तितीतून जात होते, अशा काही गोष्टींमुळे आई बाहेर येऊ शकली नाही. माझ्या आई-वडिलांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यानंतर कुठे त्यांना सोबत राहायला मिळाले. तिला या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे.” अरबाज सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याच्या अगामी चिक्षपटांसाठी चर्चेत आला आहे.

अधिक वाचा- 
कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल
सर्जनशील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबाविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा