साऊथ इंडस्ट्री ते बॉलिवूड, आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये आघाडीचे नाव येते म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी आज आपल्यात नाहीयेत, पण त्या त्यांच्या सिनेमांमधून नेहमीच चाहत्यांच्या आठवणीत जिवंत राहतील. 13 ऑगस्ट हा श्रीदेवींचा जन्मदिवस. आज त्यांचा 60वा जन्मदिन आहे. या खास क्षणी त्यांच्या चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण त्यांची आठवण काढत आहेत. अशात श्रीदेवीचे पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवीचा एक खास आणि कधीच न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोत बोनी स्वत: त्यांच्यासोबत दिसत आहेत.
बोनी कपूर इंस्टाग्राम पोस्ट
श्रीदेवी (Sridevi) यांच्या 60व्या जन्मदिनानिमित्त सोशल मीडियावर अनेकजण त्यांच्याशी संबंधित आठवणी शेअर करत आहेत. अशात श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर (Boney Kapoor) यांनीही पत्नीसोबतचा खास फोटो शेअर करत त्यांना या खास दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत. बोनी कपूर यांनी इंस्टाग्रामवर श्रीदेवीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही तरुण आणि खुश दिसत आहेत. या फोटोत श्रीदेवी यांनी काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तसेच, बोनी कपूर यांनी वुलेन ड्रेससोबत लाल टोपी परिधान केली आहे. यासोबतच बोनी यांनी श्रीदेवीला प्रेमाने मिठीत पकडले आहे.
हा खास फोटो शेअर करत बोनी कपूर यांनी “वाढदिवसाच्या शुभेच्छा,” असे लिहिले आहे. यासोबतच त्यांनी तीन हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.
View this post on Instagram
खुशी कपूरनेही केले विश
अभिनेत्री श्रीदेवी यांची छोटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) हिनेही आईला विश केले आहे. या खास क्षणी खुशीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आईसोबतचा फोटो शेअर केला. या फोटोत श्रीदेवी तिच्या दोन्ही मुलींसोबत म्हणजेच खुशी आणि जान्हवी कपूर हिच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो तिच्या बालपणीचा आहे. फोटोत श्रीदेवी आपल्या मुलींसोबत खूपच आनंदी दिसत आहे.

श्रीदेवीचे सिनेमे
अभिनेत्री श्रीदेवी यांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यामध्ये ‘लाडला’, ‘मिस्टर इंडिया’, ‘मॉम’, ‘चांदणी’, ‘खुदा गवाह’, ‘नगिना’, ‘सोने पे सुहागा’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (director boney kapoor and khushi kapoor gets emotional on sridevi birth anniversary share photos)
महत्त्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं
नाद करा पण रजनीकांतचा कुठं! ‘Jailer’ने 3 दिवसात छापले ‘एवढे’ कोटी, आकडा वाचून आकडीच येईल