Saturday, September 30, 2023

नाद करा पण रजनीकांतचा कुठं! ‘Jailer’ने 3 दिवसात छापले ‘एवढे’ कोटी, आकडा वाचून आकडीच येईल

सध्या देशभरात सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर‘ सिनेमाची चर्चा रंगली आहे. रिलीजपूर्वीपासूनच चाहत्यांनी या सिनेमाची तिकीटे आधीच बूक केली होती. तसेच, जेव्हा सिनेमा गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) चित्रपटगृहात रिलीज झाला, तेव्हा प्रेक्षकांची एकच गर्दी पाहायला मिळाली. सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली. त्यानंतर आता बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी जेलर 100 कोटींची कमाई करण्यात यशस्वी झाला आहे. विशेष म्हणजे, सिनेमाने जगभरात 200 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पाही ओलांडला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, तिसऱ्या दिवशी रजनीकांत (Rajinikanth) यांच्या जेलर (Jailer) सिनेमाने 35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सिनेमाची कमाई 109.10 कोटी रुपये झाली आहे. भारतात जेलर 100 कोटींच्या (Jailer 100 Crore) क्लबमध्ये एन्ट्री करण्यासोबतच परदेशातही धमाल करत आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी 48.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण झाली होती. सिनेमाला जवळपास 25 कोटींवर समाधान मानावे लागले होते. मात्र, शनिवारी (दि. 12 ऑगस्ट) सिनेमाने पुन्हा उसळी घेत 35 कोटींची कमाई केली.

खरं तर, सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा सिनेमा फक्त भारतातच नाही, तर जगभरात तुफान कमाई करत आहे. या सिनेमाच्या जगभरातील बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहिली, तर पहिल्या दिवशी सिनेमाने 95.78 कोटी, दुसऱ्या दिवशी 56.24 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 68.51 कोटी रुपयांची कमाई केली. अशाप्रकारे सिनेमाने एकूण 220.53 कोटींची कमाई केली. या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

‘जेलर’ हा सिनेमा 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला आहे. या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. सिनेमातील ‘कावला’ हे गाणे सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड होत आहे. सिनेमातील कलाकारांविषयी बोलायचं झालं, तर यामध्ये शिव राजकुमार, मिरना मेनन, तमन्ना भाटिया, मोहनलाल, आणि वसंत रवी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (jailer box office collection day 3 rajinikanth jailer enters 100 crore club in 3 days read here)

महत्त्वाच्या बातम्या-
‘मला रामायण आणि महाभारत पाहण्याची परवानगी नव्हती’, अभिनेत्रीसोबत असं का वागायची आई? स्वत:च केला खुलासा
‘Gadar 2’च्या स्क्रीनिंगला सावत्र बहिणीसोबत दिसले सनी आणि बॉबी; चाहता म्हणाला, ‘ही बाँडिंग फक्त प्रमोशनसाठी’

हे देखील वाचा