Friday, September 20, 2024
Home टेलिव्हिजन अंकिता लोखंडेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं

अंकिता लोखंडेच्या जवळच्या व्यक्तीचे निधन, मायेचं छत्र हरपलं

कलाविश्वातून काळीज तोडणारी बातमी समोर येत आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन झाले आहे. शशिकांत लोखंडे 68व्या वयात हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने अभिनेत्रीला मोठा धक्का बसला आहे. शशिकांत यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आले नाहीये. मात्र, असे म्हटले जात आहे की, मागील काही काळापासून अभिनेत्रीचे वडील आजारी होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या वडिलांवर 13 ऑगस्ट रोजी अंतिम संस्कार केले जातील. खरं तर, शशिकांत लोखंडे (Shashikant Lokhande) यांच्या निधनावर अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये. मात्र, तिचे चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

मागील महिन्यात रुग्णालयातून घरी परतले होते अंकिताचे वडील
अंकिताचे वडील जेव्हा रुग्णालयातून घरी परतले होते, तेव्हा अभिनेत्रीने फोटो शेअर केले होते. तिने एक नोट लिहिली होती, ज्यात तिने आनंद व्यक्त केला होता की, तिचे वडील आता बरे आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत तिने इतर कोणतीही माहिती दिली नव्हती. तिने लिहिले होते की, “बाबा तुम्ही रुग्णालयातून परतला आहात. तुम्ही आणि तुमच्या चांगल्या आरोग्यापेक्षा मला जास्त आनंद कशातूनच मिळू शकत नाही. मी आशा करते की, बिन शर्त आणि नेहमी मी तुमची काळजी घेईल, ज्याप्रकारे तुम्ही माझी आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. सर्वांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद.”

‘फादर्स डे’निमित्त पोस्ट केलेली शेअर
अंकिता लोखंडे इंस्टाग्राम (Ankita Lokhande Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूपच सक्रिय असते. तिने ‘फादर्स डे’निमित्त वडिलांसोबत फोटो शेअर करत भावूक नोटही लिहिली होती. तिने लिहिले होते की, “फादर्स डेच्या शुभेच्छा. माझे पहिले हिरो माझे वडीलच राहिले आहेत. मी माझ्या भावना व्यवस्थित व्यक्त करू शकत नाहीये की, मला तुमच्याबाबत काय वाटते. खूप प्रेम बाबा. मी तुम्हाला गोष्टीतून संघर्ष करताना पाहिले आहे. जेव्हा लहान होते, तेव्हाही तुम्हाला संघर्ष करताना पाहिले होते. मात्र, तुम्ही तुमच्या मुलांना संघर्ष करू दिला नाही. आम्हाला सर्वकाही दिले. मला पंख दिले, ज्यामुळे मी उडू शकेल. ते सर्व करू दिले, जे मला हवे होते.”

अंकिताच्या मालिका आणि सिनेमे
अभिनेत्री अंकिता लोखंडेला टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता’मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, ती आता फक्त टीव्हीपुरती मर्यादित राहिली नाहीये. तिने रुपेरी पडद्यावरही अभिनयाचा डंका वाजवला आहे. ती अभिनेत्री कंगना रणौत हिच्या ‘मणिकर्णिका’ सिनेमात दिसली होती. या सिनेमातूनच तिने बॉलिवूड पदार्पण केले होते. सध्या अभिनेत्री रुपेरी पडद्यापासून दूर आहे. (actress ankita lokhande father shashikant lokhande passed away at 68 age read here)

महत्त्वाच्या बातम्या-
श्रीदेवीच्या मृत्यूपूर्वी जान्हवीने आईला सांगितलेले ‘हे’ शेवटचे शब्द, वाचून तुमच्याही डोळ्यात येतील अश्रू
बाथटबमध्ये श्रीदेवीला ‘त्या’ अवस्थेत पाहून सुन्न झाले होते बोनी कपूर! वाचा नेमकं काय घडलं होतं ‘त्या’ काळरात्री…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा