Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड जेव्हा वजन वाढल्यामुळे सलमानने ‘या’ अभिनेत्याला म्हटलेले, ‘मी तुला काम नाही देणार’, त्यानेच केला खुलासा

जेव्हा वजन वाढल्यामुळे सलमानने ‘या’ अभिनेत्याला म्हटलेले, ‘मी तुला काम नाही देणार’, त्यानेच केला खुलासा

बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. यामध्ये अभिनेता रोहित रॉय याच्या नावाचाही समावेश आहे. रोहित अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला होता. त्याने सांगितले होते की, सलमान खान याने एकदा त्याला ‘जाड गाय’ म्हटले होते. या वक्तव्यामुळे अभिनेता पुन्हा चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

काय म्हणालेला सलमान?
अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) याने खुलासा केला की, त्याच्या कारकीर्दीत एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्याला चांगल्या भूमिकाच मिळत नव्हत्या. त्यामुळे तो त्याच्या टीव्हीवरील कामाने निराश होता. त्याने हेदेखील सांगितले की, तो आता त्याचा फिटनेसवरही लक्ष ठेवतो. तो म्हणाला, “जेव्हा मी अभिनेता बनण्याचा विचार केला होता, तेव्हा त्यांनी मला म्हटले होते की, तू 60च्या दशकातील हॉलिवूड अभिनेत्यासारखा दिसतो. तू तसे कपडे घातले पाहिजेत.” त्याने सांगितले की, सलमान आधी त्याची तुलना हॉलिवूड अभिनेता रॉक हडसन याच्याशी करायचा.

‘माझे वजन खूपच वाढले होते’
पुढे बोलताना रोहितने सांगितले की, अहमदाबादमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये त्याची भेट सलमान खान (Salman Khan) याच्यासोबत झाली. तो म्हणाला, “माझे वजन खूपच वाढले होते. मी निराश होत होतो. कारण, गोष्टी व्यवस्थित होत नव्हत्या. मी सलमानला म्हणालो की, मी खुश नाहीये. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे, पण गोष्टी व्यवस्थित होत नाहीयेत. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हटले की, तू एक जाड गाईसारखा दिसतो. एवढा की, मी तुला कोणतेही काम देणार नाही.”

सलमानची गोष्ट ठेवली लक्षात
त्याने पुढे सांगितले की, “त्यावेळी मी 45-46 वर्षांचा होतो. मी ठरवले की, 50 वय होण्यापूर्वी फिट व्हायचे आहे आणि तसंच झालं.” सलमानचे वक्तव्य आठवत 54 वर्षीय अभिनेता म्हणाला की, “त्यांनी म्हटले होते की, एकतर असाच राहा, किंवा लढत राहा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Bose Roy (@rohitboseroy)

रोहित रॉयचे सिनेमे
अभिनेता रोहितने अनेक हिंदी सिनेमात काम केले आहे. त्याच्या सिनेमांमध्ये ‘शूटआऊट ऍट लोखंडवाला’, ‘मुंबई सागा’, ‘काबिल’, ‘जान तेरे नाम’, ‘दस कहानियां’ आणि ‘फॉरेन्सिक’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (actor salman khan told rohit roy on weight gain i will not give you any work actor revealed)

महत्त्वाच्या बातम्या-
‘Gadar 2’च्या कमाईत घसरण! 7व्या दिवसाचे कलेक्शन खूपच कमी, 300 कोटींच्या क्लबमध्ये करणार का एन्ट्री?
देशातच नाही, तर जगभरात गाजतोय रजनीकांतच्या ‘Jailer’चा डंका, वाचा सिनेमाने 8व्या दिवशी किती छापले

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा