अभिनेता रोहित रॉयने सोशल मीडियावर शेअर केले फोटो; गजब ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीही व्हाल थक्क


आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेता म्हणजे रोहित रॉय. रोहित नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना खुश करत असतो. त्याच्या फोटोला त्याचे चाहते देखील जबरदस्त प्रतिसाद देताना दिसत असतात. नुकतेच सोशल मीडियावर त्याने काही फोटो शेअर केले आहेत. त्याने वेगवेगळ्या वेळचे शर्टलेस फोटो कोलाज करून शेअर केले आहे. त्याने हे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “बदल होण्यास वेळ लागतो. कोणताही शॉर्टकट नाहीये आणि कोणतीही मॅजिक पिल देखील नाहीये.” त्याच्या या फोटोवर सुनील शेट्टी, संजय कपूर, मोहित मलिक आणि सिमोन सिंगसहित अनेक कलाकार प्रतिक्रिया देत आहेत. (Rohit Roy surprised people to show his transformation)

रोहितने ट्विटरवर देखील हे कोलाज शेअर केले आहे. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्याचे चाहते हैराण झाले आहेत. अनेकांनी त्याला त्याच्या वर्कआऊट आणि डाएटबाबत प्रश्न विचारले आहेत. त्याच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुम्हाला सलाम मास्टर, तुम्हाला अजून जास्त ताकत मिळो. प्रेरित व्हा आणि आणखी लाखो लोकांना प्रेरित करा.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले आहे की, “आम्ही नेहमी हा विचार केला होता की, तू एक हॉलिवूड मटेरियल आहे.”

रोहितने ‘देश मैं निकला हुआ चांद’, ‘मिलन और स्वाभिमान’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने कमालीची भूमिका निभावली आहे. त्याने ‘शूट आऊट ॲट लोखंडवाला’, ‘फॅशन’, ‘अपार्टमेंट’ आणि ‘काबील’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो या वर्षाच्या सुरुवातीला संजय गुप्ता यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटात दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्यावर अभिनेत्री राणीने लावले जोरदार ठुमके; दिलखेचक अदांना चाहत्यांची पसंती

-पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल

-‘…ती सई चोर आहे’, म्हणत मोठ्या बहिणीच्या व्यथा मांडताना दिसली मृण्मयी; सोबतच गौतमीवर लावले तिने गंभीर आरोप


Leave A Reply

Your email address will not be published.