Tuesday, September 17, 2024
Home टॉलीवूड देशातच नाही, तर जगभरात गाजतोय रजनीकांतच्या ‘Jailer’चा डंका, वाचा सिनेमाने 8व्या दिवशी किती छापले

देशातच नाही, तर जगभरात गाजतोय रजनीकांतच्या ‘Jailer’चा डंका, वाचा सिनेमाने 8व्या दिवशी किती छापले

मागील आठवड्यात गुरुवारी (दि. 10 ऑगस्ट) देशभरात रिलीज झालेला सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘जेलर‘ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच राडा करतोय. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. आता जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 400 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ‘जेलर’ एक आठवड्यानंतरही बक्कळ कमाई करत इतर सिनेमांचे विक्रम मोडताना दिसत आहे.

रजनीकांत (Rajinikanth) यांची मुख्य भूमिका असलेला ‘जेलर’ (Jailer) सिनेमाने 16 ऑगस्ट रोजी 15 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली होती. ही कमाई एका वीकडेच्या हिशोबाने खूपच जास्त होती. या सिनेमाने अवघ्या 7 दिवसातच कमल हासन (Kamal Haasan) यांच्या ‘विक्रम’ या सिनेमाची कमाई मागे टाकली आहे. चला तर, सिनेमाने रिलीजच्या आठव्या दिवशी (Jailer Box Office Collection Day 8) किती कमाई केली, हे पाहूयात…

‘जेलर’ची 8व्या दिवसाची कमाई किती?
रजनीकांत यांचा ‘जेलर’ सिनेमा जगभरात वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने 16 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात एक आठवडा पूर्ण केला. मात्र, अजूनही या सिनेमाचा दबदबा कायम आहे. ट्रेड रिपोर्ट्सनुसार, या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. तसेच, भारतीय बॉक्स ऑफिसवर सिनेमा धमाल करताना दिसत आहे.

अशात समोर आलेल्या वृत्तानुसार, सिनेमाच्या 8व्या दिवसाच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. ‘जेलर’ने रिलीजच्या आठव्या दिवशी अंदाजे 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे रजनीकांत यांच्या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 235.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘जेलर’ने जगभरात ‘गदर 2’ला सोडले मागे
‘जेलर’ सिनेमात रजनीकांत यांची मुख्य भूमिका असून दिग्दर्शनाची जबाबदारी नेल्सन दिलीपकुमार यांनी पार पाडली आहे. ‘जेलर’ने समीक्षकांची मने जिंकली असून ऍक्शन आणि सर्व विभागात धमाल केली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सिनेमाने जगभरात 416 कोटी रुपये कमावले आहेत. याबाबतीत सिनेमाने सनी देओल (Sunny Deol) याच्या ‘गदर 2’ (Gadar 2) सिनेमाला मागे टाकले आहे. ‘गदर 2‘ने जगभरात 338.5 कोटी रुपये कमावले आहेत.

यापूर्वी कमल हासन यांच्या ‘विक्रम’ने जगभरात 410 कोटी रुपये कमावले होते. म्हणजेच ‘जेलर’ने ‘विक्रम’चाही रेकॉर्ड मोडित काढला आहे. मात्र, अधिकृत बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आल्यानंतर या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो. तसेच, रजनीकांत यांचा हा सिनेमा कॉलिवूडचा सर्वाधिक कमाई करणारा तिसऱ्या क्रमांकाचा सिनेमा बनला आहे. (superstar rajinikanth jailer box office collection day 8 film earned 10 cr india net on eight day crossed 400 crores worldwide)

महत्त्वाच्या बातम्या-
मराठी सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर! अभिनेत्याने कमी वयात सोडलं जग
आयुर्वेदाचार्य ते अभिनेता, ‘असा’ आहे गिरीश ओक यांचा जीवनप्रवास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा