टेलिव्हिजन जगतात अनेक लोकप्रिय मालिका आहेत. या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने नेहमीच तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या 12 वर्षांपासून मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, या मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका. मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पात्राची एक वेगळीच खासियत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. यातील नेहमीच प्रत्येकाच्या ओठावर असलेलं पात्र जेठालाल.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेमधील जेठालाल गडा म्हणजे दिलीप जोशी हे प्रेक्षकांच्या आवडीचे पात्र आहे. दिलीप जोशी यांची फॅन फॉलोविंग देखील इतर अभिनेते आणि अभिनेत्रींपेक्षा जास्त आहे. यामुळे त्यांची या मालिकेमधील फी देखील अन्य कलाकारांपेक्षा जास्त आहे. त्यांची एका एपिसोडची फी ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
माध्यमांतील वृत्तानुसार, दिलीप जोशी हे ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे सगळ्यात जास्त फी घेणारे कलाकार आहेत. त्यांची फी बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच आहे. त्यांना एका एपिसोडसाठी दीड लाख एवढी फी दिली जाते. मालिकेमध्ये जेठालाल आणि त्यांचे कुटुंब केंद्रस्थानी आहे. त्यामुळे त्यांच्यापासूनच प्रत्येक एपिसोडची सुरुवात होत असते. या मालिकेतील अनेक कलाकारांवर मीम देखील बनवले जातात. त्या प्रचंड प्रसिद्ध होतात.
दिलीप जोशी हे या मालिकेतील सगळ्यात जास्त लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांचा अभिनय, विनोद आणि टायमिंगला दादच नाहीये. या मालिकेत अनेक वर्षांपासून दया बेनची भूमिका निभावणारी दिशा वकानीने वैयक्तिक कारणांमुळे ही मालिका सोडली, अशी माहिती मिळाली आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी तिला दुप्पट फी देण्याचे देखील कबूल केले होते. तरीही तिने या मालिकेमध्ये यायला नकार दिला आहे. दया बेन हे देखील या मालिकेमधील एक महत्वाचे पात्र आहे. जेठालाल प्रमाणेच तिचे फॅन फॉलोविंग देखील प्रचंड आहेत. ती गेल्याने या मालिकेचा टीआरपी घसराला आहे, अशी सर्वत्र चर्चा चालू आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-