लोकप्रिय मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकत्र एक नव्या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव आहे ‘पठ्ठे बापूराव’. या चित्रपटात प्रसाद ओक पठ्ठे बापूरावच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर अमृता खानविलकर त्यांची पत्नी पवळाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक (Prasad Oak) स्वत: करणार आहेत. चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती स्वरुप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली केली जात आहे. पठ्ठे बापूराव हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लोकशाहीर होते. त्यांनी आपल्या काव्य आणि गाण्यांमधून समाजातील अनेक समस्यांवर भाष्य केले. त्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि यशाची कहाणी दाखवणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
अमृताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत प्रसाद लिहितो, “अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती…! आशीर्वाद असू द्या मायबापहो…! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न ‘पठ्ठे बापूराव’” त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
कमेंट करताना एकाने लिहिले की, “सर अजय अतुल सरांच संगीत असल का?’ तर दुऱ्याने लिहिले की, “खूप खूप शुभेच्छा…. ज्यांच्या नावातच टॅलेंट आहे. प्रसाद ओक सर आणि गं कसं करमत नाही हे जगाला सांगणारी उत्तम बाई म्हणजे हाऊ फुलची पाटी तुम्हाला… खूप खूप शुभेच्छा” तर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
View this post on Instagram
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट 29 एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे. तो चित्रपट प्रचंड गाजला. (Pathe Bapurao by Prasad Oak and Amrita Khanwilkar Post release of the film)
आधिक वाचा-
–सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा, ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाचा झाला हृदयविकाराने मृत्यू
–‘वडील मला आणि आईला रोज मारायचे अन्…’, ‘असा’ आहे उर्फी जावेदचा थक्क करणारा जीवनप्रवास