सध्या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टील चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांनी जगभरात रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या यादीत आता थलपथी विजयचा ‘लिओ’ चित्रपटही सामील झाला आहे. या चित्रपटाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सध्या हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. थलपथी विजयच्या काही चाहत्यांनी चक्क रस्त्यावर राडा घातला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चाहते रस्त्यावर गाड्या थांबवून नारळ फोडताना दिसत आहेत. ते नारळ फोडून आनंद व्यक्त करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जो चांगलाच धुमाकूळ घालत आहे. थलपथी विजयचा( Thalapathy Vijay) बहुचर्चित ‘लिओ’ हा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई करून बाजी मारली.
थलपथी विजयचा ‘लिओ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशीच जागतिक स्तरावर 148.5 कोटींची कमाई केली. त्यापैकी भारतात 64.80 कोटींची कमाई झाली. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 70 कोटींची कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरातून 215 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे. पहिल्याच दिवशी 148 कोटींची कमाई करून या चित्रपटाने रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटालाही मागे टाकलं. आता सर्वात पटकन 200 कोटींहून जास्त कमाई करणारा ‘लिओ’ हा चित्रपट ठरला आहे.
Fans celebrating the release of @actorvijay‘s new film ‘Leo’ by shattering hundreds of coconuts on road and disrupting traffic.
How would this help Vijay with his new film? Instead, if they had given coconuts to commuters for free and encouraged them to watch ‘Leo,’ it could… pic.twitter.com/nNL7k1hcDe
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) October 20, 2023
लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट थलपथी विजयच्या ‘लोकेश सिनेमॅटिक युनिव्हर्स’ या सिनेमॅटिक फ्रँचायझीचा एक भाग आहे. या चित्रपटात थलपथी विजय व्यतिरिक्त संजय दत्त, त्रिशा कृष्णन, मन्सूर अली खान, प्रिया आनंद, मिस्किन, अर्जुन सर्जा आणि गौतम वासुदेव मेनन यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. (After the release of famous actor Thalapathy Vijay film Leo fans stopped flowing in the streets and broke coconuts the video went viral on social media)
आधिक वाचा-
–आलिया सोबत लग्न केल्याचा रणबीरला होतोय पश्चात्ताप, ‘या’ सौंदर्यवतीवर त्याचं खरं प्रेम? म्हणाला…
–‘या’ चित्रपटात दमदार कामगिरी करताना दिसणार कियारा अडवाणी; अभिनेत्रीने दिली मोठी माहिती