Sunday, June 23, 2024

साऊथ इंडस्ट्रीमधील ‘हे’ दिग्गज अभिनेते किडनी स्टोनवरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील जेष्ठ आणि प्रतिभावान अभिनेते प्रभू यांना २० फेब्रुवारी रोजी पोटात तीव्र वेदना होत असल्याच्या कारणावरून रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना चेन्नईमधील मेडवे रुग्णालयात ते सध्या उपचार घेत आहे. या हॉस्पिटलमध्ये त्यांना स्कॅन केल्यानंतर त्यांच्या अकिडनीमध्ये स्टोन आढळून आला आहे. यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर युरेथ्रोस्कोपी लेसर शस्त्रक्रिया करून स्टोन काढले आहेत. काही चाचण्यांनंतर त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.

prabhu ganeshan

प्रभू यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊन ते सुखरूप घरी यावे यासाठी त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. प्रभू हे दक्षिण सिनेसृष्टीतील सर्वात जास्त काम करणारे कलाकार आहेत. सर्वच निर्माते आणि दिग्दर्शकांना प्रभू हे त्यांच्या सिनेमात पाहिजे असतात. ते सध्या तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसतात. प्रभू यांचे त्यांच्या हॉस्पिटलकडून मेडिकल बुलेटन देण्यात आले, त्यात त्यांची प्रकृती स्थिर असून, ते उपचारांना योग्य प्रतिसाद देत आहेत.

प्रभू हे एक प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते असून ते प्रामुख्याने तामिळ सिनेमात काम करतात. प्रभू हे शिवाजी गणेशन यांचे चिरंजीव असून, त्यांनी १९८२ साली ‘सांगली’ सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ८० च्या दशकात ते प्रमुख अभिनेते म्हणून दक्षिण इंडस्ट्रीमध्ये ओळखले जायचे. प्रभू यांना नुकतेच आपण वामशी पैडिपल्ली दिग्दर्शित थलपथी विजयच्या “वारीसु” मध्ये पाहिले. लवकरच ते मणिरत्नम यांच्या पोनियिन सेल्वन: भाग २ मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा एक पिरियड ड्रामा सिनेमा असणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा