Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

आयुष्यात आईला गमावण्याचे दुःख…; तेजश्री प्रधानचं मातृछत्र हरपलं

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीच्या आईचं निधन झाले आहे. तेजश्रीच्या आई सीमा प्रधान यांनी गुरुवारी (16 नोव्हेंबर) अखेरचा श्वास धेतला आहे. त्यांचे निधन मुंबईत राहत्या घरी झाले आहे. तेजश्रीची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण त्याच्या आजारीचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.

तेजश्रीने (Tejshree Pradhan) तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आईला सोबत घेऊनच केली होती. त्यामुळे तिचा मोठा आधारस्तंभ आता हरपला आहे. तेजश्रीच्या आईने दोन महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या प्रेमाची गोष्ट मालिकेचं स्पेशल स्क्रीनिंग पाहिलं होतं. तेजश्री प्रधान सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत एका सक्षम महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेत तिच्याबरोबर अभिनेता राज हंसनाळे व अपूर्वा नेमळेकर प्रमुख भूमिका साकारत आहेत.

तेजश्री प्रधानच्या आईच्या निधनाने मराठी कलाविश्वात शोक व्यक्त करण्यात आला आहे. तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचं खूप महत्वाचं स्थान होतं. त्या प्रत्येक चित्रीकरणाला तेजश्रीच्या सोबत सेटवर जायच्या. पण आता ऐन दिवाळीत तिला मोठ्या दुःखाचा सामना करावा लागत आहे. आईच्या निधनानंतर तेजश्री खूप खचून गेली आहे. (Famous Marathi actress Tejshree Pradhan mother passed away)

आधिक वाचा-
विघ्नेश आधी ‘या’ दोन कलाकारांची धडकन होती नयनतारा, जाणून घ्या का तुटले त्यांचे नाते
जेव्हा नयनतारा आणि प्रभुदेवा बुडाले होते अखंड प्रेमात, पत्नीसोबतही घेतला होता घटस्फोट वाचा भन्नाट लवस्टोरी

हे देखील वाचा