Monday, September 25, 2023

तेजश्री प्रधानला मिळाली नवी मालिका; अभिनेत्रीनं खास व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती

मराठी चित्रपट जगातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखले जाते. तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. तेजश्री तिच्या सोज्वळ सौदर्यांसाठी देखील ओळखली जाते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तेजश्री तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एतकचंं नाही तर ती तिच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल देखील माहिती देत असते. तेजश्री ही मराठी चित्रपटजगात आणि छोट्या पडद्यावरील खूप नावाजलेली अभिनेत्री आहे.

अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करुन तेजश्रीने (Tejshree Pradhan)  घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. तेजश्रीचे लाखो चाहते आहेत. तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती एका नवीन मालिकेत झळकणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तेजश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तेजश्री चाहत्यांना काहीतरी सांगत असल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या नवीम मालिकेविषयी बोलताना दिसत आहे.

तेजश्री लवकरत स्टार प्रवाहवरील एका नवीन मालिकेत दिसणार आहे. पण तिच्या या नवीन मालिकेविषयी तिने अद्यापही कोणतीही माहिती दिलेली नाही. पण एका फॅनने केलेल्या कमेंटनुसार मराठी मिडीयम असं या मालिकेचं नाव आहे. याशिवाय 21 ऑगस्टपासुन रात्री 8 वाजता ही मालिका सुरु होणार आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मंडळी, आपली लाडकी अभिनेत्री तेजश्री लवकरच आपल्या भेटीला येतेय स्टार प्रवाहवर एका नव्या कोऱ्या मालिकेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तेजश्रीच्या या व्हिडिओवर कमेट करताना एकाने लिहिले की, “आम्ही याचीच तर वाट पाहत होतो.” तसेच दुलऱ्या चाहतीनं लिहिलं आहे की, “लवकर ये ताई, मी आणि माझे कुटुंब तुझी खूप वाट पाहत आहोत.” तिच्या हा व्हिडिओ काही तासांमध्येच खूप व्हायरल झाला आहे. (Actress Tejashree Pradhan’s new serial will be coming on Star Pravaha)

अधिक वाचा- 
गुलाबी रंगात रंगली कियारा आडवाणी, पाहा फोटो
‘ओह माय गॉड 2’ चित्रपटाच दुसरं गाणं रिलीज, पाहायला मिळाले अक्षयचे ‘महादेव’ रूप

हे देखील वाचा