Friday, May 24, 2024

जेव्हा नयनतारा आणि प्रभुदेवा बुडाले होते अखंड प्रेमात, पत्नीसोबतही घेतला होता घटस्फोट वाचा भन्नाट लवस्टोरी

साऊथ इंडस्ट्रीत अनेक मनमोहत सौंदर्याने परिपूर्ण अशा अभिनेत्री आहे, यातीलच एक म्हणजे नयनतारा. ती गेल्या काही वर्षांपासून अभिनेता आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन याच्याशी रिलेशनशीपमध्ये होती. आता त्यांनी त्यांच्या नात्याला नाव दिले असून 9 जून रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती, तसेच लग्नातील अनेक फोटो व्हिडिओही व्हायरल झाले. पण तुम्हाला माहित आहे का की विघ्नेशबरोबर नाव जोडण्यापूर्वी नयनतारा हिचे भारतातील एका दिग्गज कलाकाराबरोबरही नाव जोडले होते. त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा केवळ साऊथ इंडस्ट्रीतच नव्हे, तर भारतभरात झाली. कोण होता तो कलाकार आणि काय होता हा किस्सा जाणून घ्यायचं असेल, स्टोरी शेवटपर्यंत वाचा.

तर, मंडळी नयनतारा म्हणजे अनेक युवकांसाठी दिलों की धडकन. त्यात ती सेलिब्रेटी आहे म्हणल्यावर तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा होणार, हे सहाजीकच. तसंच नयनतारा तिच्या चित्रपटांबरोबर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत राहिली. खरंतर ती एका ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेली, तिचं खरंनाव डायना मरियम कुरियन. पण तिने तिचे नाव बदलत नयनतारा केले. पण ती सर्वाधिक चर्चेत आली ते प्रभुदेवाबरोबरच्या तिच्या अफेअर मुळे. तर मंडळी नयनतारा आणि ज्या कलाकाराच्या लव्हस्टोरीची चर्चा सर्वाधिक झाली, तो कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून प्रभुदेवाच आहे. ज्या प्रभुदेवाला इंडियन मायकल जॅक्सन, डान्सचा देवता म्हटले जाते. त्याने अनेक हिट चित्रपटात कोरिओग्राफी केली आहे. एवढेच नाही, तर तो एक दिग्दर्शक आणि प्रोड्यूसरही आहे. याच प्रभुदेवासोबत नयनतारा रिलेशनशीपमध्ये होती आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा 10 एक वर्षांपूर्वी प्रचंड गाजल्या होत्या.

अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितल्या प्रमाणे झाले असे की, 2008 मध्ये विल्लू चित्रपटादरम्यान नयनतारा आणि प्रभुदेवा जवळ आले होते. या चित्रपटात नयनातारा अभिनय करत होती, तर प्रभुदेवा कोरिओग्राफी करत होता. या चित्रपटापासूनच त्यांच्यातील मैत्री बहरु लागली आणि प्रेमही वाढू लागले. पण खंरतर त्यापूर्वीच प्रभुदेवाचे लग्न झालेले होते. त्याने 1995मध्ये क्लासिकल डान्सर रामलता बरोबर लग्न केले होते. रामलता मुस्लिम होती, पण प्रभुदेवाबरोबर लग्न केल्यानंतर त्यांनी धर्म बदलला. पुढे प्रभुदेवा आणि रामलता यांचा संसार चांगला सुरू होता. त्यांना तीन मुलेही झाले. पण 2008 वर्षाने त्यांच्या कुटुंबात मोठा बदल घडवून आणला. याचवर्षी त्यांच्या मोठ्या मुलाचे कॅन्सरमुळे निधन झाले. त्यानंतर प्रभुदेवा आणि नयनतारा यांच्यातही मैत्री फुलू लागल्याच्या बातम्या आल्या. पण सुरूवातीला या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल बोलण्याऐवजी गप्प बसणेच पसंत केले. मात्र 2010 मध्ये प्रभुदेवाने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला.

आता नवरा दुसऱ्या एका स्त्रीच्या प्रेमात वेडा झालाय म्हणल्यावर एका पत्नीची जशी रिऍक्शन येणे सहाजिक आहे, तशीच प्रभुदेवाच्या पत्नीची आली. तिने नयनताराबद्दल आक्रमक वक्तव्य केली, तिने प्रभुदेवावरही टीका केली. प्रभुदेवाने डिओर्सची मागणी केली, पण तिने त्याला नकार देत, त्याच्याविरुद्ध पेटीशन फाईल केले. पण अखेर बऱ्याच दिवस चाललेल्या केसनंतर या दोघांचा डिओर्स झाला. यादरम्यान, असेही समोर आले की प्रभुदेवा आणि नयनतारा हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहात होते. तसेच प्रभुदेवासाठी नयनताराने हिंदू धर्माचाही स्विकार केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण प्रभुदेवाने डिओर्स घेतल्यानंतर मात्र 2011मध्ये त्याचे आणि नयनतारा यांचाही ब्रेकअप झाला. मात्र, त्यांच्या ब्रेकअपचे नक्की कारण काय होते, हे मात्र समोर आले नाही. पण असे म्हटले जाते की प्रभुदेवा नयनताराबरोबर लिव्ह इनमध्ये राहात असताना त्याच्या मुलांना भेटायला जायचा, जे नयनताराला आवडत नव्हते. तसेच प्रभुदेवा लग्नासाठी तयार होत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात ब्रेकअप झाले.

असो, पण या सर्वप्रकरणाने प्रभुदेवा आणि नयनतारा यांच्या आयुष्यात मात्र मोठी खळबळ माजवली. असे असले तरी पुढे या दोघांनीही आपापले मार्ग वेगळे केले आणि आपल्या करियरवर लक्ष केंद्रीत करत मोठे यश मिळवले. आज दोघेही आपापल्या करियरमध्ये स्थिर आहेत. नयनताराने आता विघ्नेशबरोबर संसार थाटला असून प्रभुदेवानेही त्याच्या करियरमध्ये मोठी प्रगती केली. त्याने राष्ट्रीय पुरस्कारही मिळवले आणि त्याचा त्याच्या करियरमधील यशामुळे पद्मश्री पुरस्कारानेही गौरव करण्यात आलाय.

हेही वाचा-
HBD साऊथची धकधक गर्ल ‘नयनतारा’: प्रभुदेवासाठी ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्विकारला मात्र….
विघ्नेश आधी ‘या’ दोन कलाकारांची धडकन होती नयनतारा, जाणून घ्या का तुटले त्यांचे नाते

हे देखील वाचा