Friday, September 18, 2026
Home बॉलीवूड ‘तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, थोडे ऑक्सिजन लोकांमध्ये वाटा’, राखी सावंतचे ‘पंगा क्वीन’ला आवाहन

‘तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, थोडे ऑक्सिजन लोकांमध्ये वाटा’, राखी सावंतचे ‘पंगा क्वीन’ला आवाहन

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हे असे नाव आहे जे, ते कायमच चर्चेत असते. मग ती चर्चा तिच्या डान्समुळे असो की, सोशल मीडियावर तिने आपले मांडलेले मत असो, याची चर्चा तर कायमच होत असते. राखी सावंत हिने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणादरम्यान कंगना रणौत हिला मोठे आवाहन केले आहे. राखी सावंत हिने कंगना रणौतबद्दल बोलताना सांगितले की, तिने गरजूंना ऑक्सिजन सिलिंडरचे वितरण करावे. बॉलिवूडमधील सर्व कलाकार कोव्हिडग्रस्त रूग्णांसाठी रुग्णालये आणि बेडच्या व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत, पण दुसरीकडे कंगनाकडून आतापर्यंत अशी कोणतीही मदत मिळालेली नाही.

राखी सावंत ही कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे, राखी सावंत ‘बिग बॉस १४’ शो नंतर प्रेक्षकांचे फार मनोरंजन करत आहे. जेव्हा जेव्हा ती घराबाहेर असते, तेव्हा तिचा व्हिडिओ कायम समोर येत असतो. प्रत्येक वेळी ती कॅमेरासमोर काहीतरी मजेदार करते. या आत्ताच्या व्हिडिओमध्ये राखी सावंत पूर्ण नाट्यमय शैलीत दिसत आहे. तोंडावर दोन मास्क आणि दोन्ही हातात सॅनिटायझरची बाटली घेऊन, ती आपल्या कारमधून बाहेर पडताना दिसली आहे.

कारमधून खाली येताच ती, सॅनिटायझर आजूबाजूला मारताना दिसत आहे, आणि ‘कोरोनाला तरूण होऊ देणार नाही’,’ असे म्हणताना दिसली. ती म्हणाली, ‘पाहा, आपण कोरोनाला पाळू नका, त्याला तरुण होऊ देऊ नका, ती आत्ता मुले आहे.’ या सर्व गोष्टी ऐकून सर्वजण हसताना दिसतात.

ती सगळ्यांना सांगत आहे की, माझ्यासारखे दोन मास्क एकाचवेळी वापरात जा. अखेर तिने कंगनासाठी निरोप दिला आहे. ती म्हणाली, ‘कंगना जी, तुम्ही देशाची सेवा करा, तुमच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत, थोडे ऑक्सिजन विकत घ्या, आणि लोकांमध्ये वाटून टाका.’

यावेळी सर्व कलाकार कोव्हिड रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. अशा रुग्णांसाठी सोनू सूद सतत ऑक्सिजन सिलिंडर आणि बेडची व्यवस्था करत आहे, तर सुनील शेट्टीसुद्धा मोफत ऑक्सिजन केंद्रेदारांच्या मोहिमेमध्ये सामील झाले आहेत.

सुनील शेट्टी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, ‘सर्व मित्र आणि चाहत्यांना आवाहन आहे की, तुम्हाला एखाद्याला मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आपणास या मिशनमध्ये सामील व्हायचे असल्यास, कृपया संदेश द्या. कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1387286753686343684

भारतात सोनू सूद, सुनील शेट्टी, सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगणसुद्धा कोरोनाच्या विषाणूविरुद्धच्या लढ्यात दिसले आहेत. अलीकडेच कंगना रणौत सोशल मीडियावर कोरोना लसीची वकिली करताना दिसली. या व्हिडिओवर तिला सोशल मीडिया युजरने ट्रोल केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा कडकच ना! नवविवाहित जोडप्याच्या हळदी समारंभाचा व्हिडिओ आला समोर; जबरदस्त भांगडा करताना दिसले सुगंधा आणि संकेत

-खरंच! आयुष्यातील पहिली किस म्हणत रणबीर कपूरने घेतले होते माधुरी दीक्षितचे नाव, सांगितले कधी आणि कसे

-याला म्हणतात गाण्याची जादू! हिमेश रेशमियाच्या ‘या’ गाण्यामुळे सापडला होता खरा चोर, दोन रात्रीत उडवले होते एक लाख रुपये

-प्रियांका चोप्राला या अवतारात पाहून चाहते झाले हैराण, फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा