Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘हनुमान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, तेजा सज्जा भारतीय सुपरहिरोचा अवतार साकारण्यासाठी सज्ज

‘हनुमान’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, तेजा सज्जा भारतीय सुपरहिरोचा अवतार साकारण्यासाठी सज्ज

तेज सज्जा स्टारर हनुमान या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटात भगवान हनुमानाची शक्ती असलेल्या एका नवीन भारतीय सुपरहिरोची प्रेक्षकांना ओळख करून देण्यात आली आहे. पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. जे नवे सिनेविश्व निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.

हा चित्रपट एका भारतीय सुपरहिरोच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे, ज्यामध्ये अभिनेता तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय विनय राय, अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथ कुमार, राज दीपक शेट्टी आणि वेनेला किशोर असे अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘कौशल्य असूनही कलाकाराला संघर्ष करावा लागतो’, करिनाने तिच्या लूकबाबत केले मोठे विधान
‘मी कतरिनाशी लग्न केले नसते तर तुझ्याशी केले असते…’, डंकीच्या सेटवर असे झाले शाहरुख आणि विकीमध्ये प्रेम
काजोलच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा, ‘या’ दिवशी मिळणार तनुजा यांना आयसीयूमधून डिस्चार्ज

हे देखील वाचा