Sunday, May 19, 2024

‘कौशल्य असूनही कलाकाराला संघर्ष करावा लागतो’, करिनाने तिच्या लूकबाबत केले मोठे विधान

अभिनेत्री करीना कपूर (Kareena kapoor) सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ आणि नेटफ्लिक्स चित्रपट ‘द बकिंघम मर्डर्स’मध्ये दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करिनाने इंडस्ट्रीत स्वत:ला कलाकार म्हणून सिद्ध करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे उघड केले.

करीनाने खुलासा केला की, ‘इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कसे दिसता यावर सतत लक्ष द्यायला भाग पाडले जाते? हे सर्व मी माझ्या पहिल्या चित्रपटापासून पाहत आले आहे. मात्र, मी नेहमीच या सगळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्यापासून दूर राहूनही एक अभिनेत्री म्हणून मला माझ्या लूकवर लक्ष द्यायला भाग पाडले आहे.

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला स्वतःवर विश्वास आहे आणि मी कशी दिसते हे मला चांगलेच माहीत आहे. माझ्या सुरकुत्या दिसल्या की मला पर्वा नाही, कारण मला माहित आहे की मी तशीच आहे. मी एक अभिनेत्री आहे. एक अभिनेत्री म्हणून अशा गोष्टी सहन करणे खूप अवघड असते. हे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. सुरुवातीपासूनच माझी इच्छा होती की लोकांनी माझे लूक नव्हे तर माझे कौशल्य पहावे. ‘रेफ्युजी’ चित्रपटापासून आजपर्यंत अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची इच्छा होती, पण आता तसे राहिलेले नाही. कारण इंडस्ट्रीत लोक टॅलेंटकडे नाही तर लूककडे पाहतात.

करीना कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री रोहित शेट्टीच्या ‘सिंघम-3’मध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीने अलीकडेच सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जान’ या चित्रपटाद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात करिनाने जयदीप अहलावत आणि विजय वर्मासोबत काम केले होते. याशिवाय करीना ‘द क्रू’ या चित्रपटातही दिसणार आहे. ‘द क्रू’मध्ये तब्बू, दिलजीत दोसांझ आणि क्रिती सेनन करीनासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मी कतरिनाशी लग्न केले नसते तर तुझ्याशी केले असते…’, डंकीच्या सेटवर असे झाले शाहरुख आणि विकीमध्ये प्रेम
काजोलच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा, ‘या’ दिवशी मिळणार तनुजा यांना आयसीयूमधून डिस्चार्ज

हे देखील वाचा