बॉलिवूड मधील ‘404’ या हॉरर चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री मीनाक्षी थापा हिने तिच्या करिअरमध्ये अगदी मोजक्याच चित्रपटात काम केले आहे. त्यातून तिने तिची ओळख देखील निर्माण केली होती. पण तिच्या धक्कादायक मृत्युने सगळे हैराण झाले होते. तिच्या मृत्यूची कहाणी ही एखाद्या सस्पेन्स थ्रिलर स्टोरीपेक्षा कमी नाहीये. काही पैशासाठी तिची हत्या केली होती. 4 ऑक्टोबर, 1984 साली डेहराडूनमध्ये मीनाक्षीचा जन्म झाला होता.
2011 साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून तिच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली होती.
पहिल्या चित्रपटातील भरघोस यशानंतर तिला 2012 साली तिला करीना कपूर आणि अर्जुन रामपाल या कलाकारांसोबत ‘हिरोईन’ या चित्रपटात काम मिळाले होते. पण यादरम्यान तिचे अपहरण करण्यात आले होते आणि तिची हत्या करण्यात आली होती. हिरोईन चित्रपटातील एक छोटासा रोल निभावणारा तिच्या ओळखीचा अभिनेता अमित जायसवाल आणि त्याची गर्लफ्रेंड प्रीति सूरीन यांनी मिळून तिचे अपहरण केले होते.
अमित आणि प्रीतिने मीनाक्षीचे अपहरण करून तिच्या आईकडे 15 लाख रुपयांची मागणी केली होती. जर तिच्या आईने पैसे नाही दिले, तर ते मीनाक्षीला ऍडल्ट चित्रपटात काम करायला लावतील अशी धमकी देखील दिली होती. तिच्या आईने त्यांना 60 हजार रुपये दिले होते. पण नंतर त्यांनी गोरखपूरमध्ये तिची हत्या केली आणि तिचे डोके तिच्या शरीरापासून वेगळे केले होते.
त्यांनतर अमित आणि प्रीतिने मिळून तिचा मृत्यूदेह एका पाण्याच्या टॅंकमध्ये फेकून दिला, आणि मुंबईला जाणाऱ्या एका बसमधून तिचे डोके फेकले होते. पण नंतर तिच्या सिमकार्ड आणि मोबाईलच्या मदतीने त्या दोघांना अटक करण्यात आली होते. 19 एप्रिल, 2012 ला तिची हत्या करण्यात आली होती. सगळ्या पुराव्याने त्यांना पकडल्याने त्या दोघांनी त्यांचा गुन्हा कबूल केला होता.
अमित आणि त्याची गर्लफ्रेंड प्रीति यांना कलम 302 (हत्या) आणि कलम 364 ए (पैशांसाठी अपहरण करणे) यामुळे जवळपास 6 वर्ष केस चालू होती. 2018 मध्ये त्या दोघांना कोर्टाने आजन्म तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’
-‘मी शांत बसणार नाही…’, आमिर खानसोबत काम केलेल्या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी, भाजपवर मोठा आरोप










