अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) अनेक तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने नुकतेच दोन्ही इंडस्ट्रींमधील कामाच्या वातावरणाबद्दल आपले मत व्यक्त केले. तिने स्पष्ट केले की, तिला असे वाटते की टॉलीवूडमधील लोक एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे काम करतात, तर बॉलीवूडमधील वातावरण वेगळे आहे.
राकुल प्रीत सिंगने नुकतेच ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना सांगितले की, तेलगू चित्रपटसृष्टीने तिचे नेहमीच स्वागत केले आहे आणि तिला पाठिंबा दिला आहे. राकुलच्या मते, तेथील अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एकमेकांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच तत्पर असतात.
तिने सांगितले की, ते आनंदाने एकमेकांच्या ट्रेलरचे प्रमोशन करतात, चित्रपटांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात आणि एकत्र यश साजरे करतात. तिला वाटते की, अशा प्रकारच्या पाठिंब्यामुळे सर्वांसाठी एक आनंदी आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते.
राकुल प्रीत सिंगने आपण काय शिकलो हे सांगितले. ती म्हणाली, “मला वाटतं की आपण खूप मागे पडत आहोत. मी तेलगू चित्रपटसृष्टीत प्रशिक्षण घेतलं आहे आणि ती इंडस्ट्री खूप एकजूट आहे. मी अनेकदा म्हटलं आहे की, जेव्हा मी मुंबईत आले.
तेव्हा मला अचानक जाणवलं की प्रत्येकजण इतका स्पर्धात्मक का आहे. तिथेही स्पर्धा आहे, पण लोक एकमेकांच्या चित्रपटांना पाठिंबा देतात.” दुसरीकडे, ती म्हणाली की तिला हिंदी चित्रपटसृष्टीत अनेकदा असुरक्षिततेची भावना जाणवते. ती म्हणाली की यामुळेच अनेक लोक इतरांच्या चित्रपटांना उघडपणे पाठिंबा देत नाहीत.
राकुल प्रीत सिंग पुढे म्हणाली, “आम्ही एकमेकांच्या चित्रपटांच्या स्क्रीनिंग किंवा प्रीमियरला जायचो. आम्ही त्याबद्दल बोलायचो किंवा सक्सेस पार्ट्यांमध्ये आनंद साजरा करायचो. कोण जात आहे, म्हणून मी जायचे, असा प्रश्न नसायचा. प्रत्येकजण एकमेकांना मदत करायला तयार असायचा. मला वाटतं की जर आपण तीच भावना मुंबई चित्रपटसृष्टीत आणू शकलो, तर आपण खरोखरच मजबूत होऊ शकतो.”
मला वाटतं की असुरक्षितता आपल्याला ते करू देत नाही आणि हे सर्व स्वतःवर काम करण्याबद्दल आहे. रकुल प्रीत सिंगचा विश्वास आहे की, जर लोकांनी एकमेकांना पाठिंबा दिला तर इंडस्ट्री आणखी मजबूत होऊ शकते. कामाच्या आघाडीवर, रकुल शेवटची ‘पती पत्नी और वो २’ मध्ये दिसली होती, ज्यात आयुष्मान खुराना, वामिका गब्बी आणि सारा अली खान यांनीही काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘महाप्रभू जगन्नाथ’च्या प्रदर्शनाला सुप्रीम कोर्टाचा ब्रेक, रथयात्रा संपेपर्यंत रिलीजला बंदी










