Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ओम शांती ओम’ या पहिल्या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणने दिले नव्हते ऑडिशन, मुलाखतीत केला खुलासा

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोणची गणना केली जाते. दीपिका नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. खरंतर बॉलिवूडमध्ये येऊन आपलं नाव कमावणं कलाकारांसाठी सोपी गोष्ट नसते, पण दीपिका पदुकोणने याबाबत जास्त मेहनत घेतली नाही. तिने शाहरुख खानसोबत ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. पण या चित्रपटासाठी तिने ऑडिशन दिले नव्हते. या सुपरहिट चित्रपटानंतर मात्र तिने कधी मागे वळून बघितले नाही. एक मुलाखतीत तिने तिच्या चित्रपटातील प्रवासाबद्दल सांगितले होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, तिने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या चित्रपटाची संपूर्ण कहाणी सांगितली होती. दीपिकाने सांगितले होते की, तिला या चित्रपटाबाबत काहीच माहिती नव्हती. तिला कॅमेऱ्यासमोर येऊन कसे बोलायचे, डायलॉग कसे म्हणायचे याबाबत काहीच माहिती नव्हती. तिने सांगितले की, फराह खानला खूप विश्वास होता की, दीपिका या चित्रपटात नीट काम करेल. तिने सांगितले की, ती अगदीच नवीन असूनही तिचे ऑडिशन घेतले गेले नव्हते. तरीही फराह खान आणि शाहरुख खान यांनी तिला मुख्य अभिनेत्री म्हणून निवड केली होती.

दीपिकाने सांगितले होते की, फराह खानसोबत शाहरुख खानने देखील तिला खूप मदत केली होती. त्यांनी तिला खूप आत्मविश्वास दिला होता. त्यामुळेच ती शांतीप्रिया हे पात्र उत्तमरीत्या निभावू शकली. तिच्या या पहिल्याच चित्रपटात तिचा डबल रोल होता. जो करणे वाटते तितके सोपे नव्हते.

दीपिकाने मुलाखतीत सांगितले होते की, एकदा तिला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर आली होती. तिने ती ऑफर स्वीकारली होती. पण नंतर निर्मात्यांनी सांगितले की, या चित्रपटाचा हिरो कुठेतरी गेला आहे आणि तो आल्यानंतर तिला हा चित्रपट असाईन केला जाईल. परंतु काही दिवसांनी दीपिकाला समजले की, या चित्रपटासाठी दुसरी कोणतीतरी हिरोईन मिळाली आहे. त्यावेळी ती खूपच नाराज झाली होती. नंतर तिला ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाची ऑफर मिळाली. हा चित्रपट तिच्या करिअरमधील सुपरहिट चित्रपट ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

-‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का

-एकेकाळी सुंदर चेहरा नाही म्हणून नाकारली गेली होती इरफान खानची अभिनेत्री, आता बॉलिवूडमध्येे वाजवतेय डंका, वाढदिवशी लिहिली भावुक पोस्ट

हे देखील वाचा