Friday, March 29, 2024

पैशांसाठी केले तिने ‘कांटा लगा’ या वादग्रस्त गाण्यामध्ये काम; एकाच रात्रीत बनली स्टार

चित्रपटसृष्टीत जर एखाद्याचे नशीब एका रात्रीत बदलते, तर एखादाला स्टारडम मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, तिच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली होती. तिने कोणत्याही चित्रपटात काम केले नाही, तर एका गाण्याद्वारे तिने प्रेक्षकांची मने चोरली. आज आपण ‘कांटा लगा गर्ल’ या नावाने प्रसिद्ध अभिनेत्री, शेफाली जरीवालाबद्दल बोलत आहोत. जिचे ‘कांटा लगा’ हे गाणे रिलीझ होताच, वादात सापडले होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, या गाण्यात शेफाली जरीवाला कशी कास्ट केली गेली होती.

सन २००२ मध्ये अल्बम गाणे ‘कांटा लगा’ रिलीझ झाले आणि रिलीझ होताच प्रेक्षकांच्या जिभेवर चढले. एकीकडे प्रेक्षक त्याची स्तुती करत होते, तर दुसरीकडे त्याला अश्लील देखील म्हटले गेले. याचे कारण असे की, या गाण्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला एक अश्लील मासिक वाचताना दिसली. त्याचबरोबर हे गाणे प्रेक्षकांना अगदी बोल्ड वाटले होते.

‘कांटा लगा’ हे गाणे रिलीझ झाले आणि गाणे डिस्को, लग्नसमारंभ, पार्टी, ऑटोरिक्षापासून ते लोकांच्या रिंग टोनपर्यंत वाजू लागले. रीमिक्स झालेल्या या जुन्या गाण्यात शेफाली जरीवालाने जबरदस्त डान्स केला आहे. विशेष म्हणजे, या बोल्ड गाण्याला लोकांनी त्यांच्या घरात बंदी घातली होती. पण खरं तर, हे गाणे जितके वादग्रस्त होते त्यापेक्षा अधिक हिट ठरले.

शेफालीने कधीही अभिनयसृष्टीत येण्याचा विचार केला नव्हता. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर, तिला एमबीए करून चांगली नोकरी करायची होती. पण या गाण्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले.

एके दिवशी कॉलेजच्या बाहेर उभी असलेली शेफाली जरीवाला, अचानक या गाण्यात कास्ट केली गेली. दिग्दर्शकाने तिला म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर दिली आणि असेही म्हटले की, यामुळे तिचे आयुष्य बदलेल. एका सामान्य कुटुंबातील शेफालीने पैशांसाठी या गाण्यात काम करायला होकार दिला. पुढे असेच काहीसे घडले, या गाण्यानंतर शेफालीचे भाग्य उलटले आणि ती एक रात्रीत स्टार बनली. यानंतर शेफालीने बॉलिवूडमध्ये बरीच हिट गाणी दिली आणि आज तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-नवव्या वर्षी पहिला सिनेमा करुन ३००हून अधिक चित्रपटात काम करणाऱ्या अरुणा इराणींना प्रेरणादायी सिनेप्रवास

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश

हे देखील वाचा