‘करीना कपूरकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीचे उत्तर ऐकून बसेल धक्का


अभिनेत्री राणी मुखर्जीला आपल्या घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाल्यामुळे ती सुद्धा कलाक्षेत्रात वळली, असे म्हणायला हरकत नाही. राणीने आपल्या घोगऱ्या आवाजाने आणि आपल्या कमालीच्या अभिनयाने आपला एक चाहतावर्ग तयार केला आहे. राणीकडे असे काही सिनेमे आले की, तिने परत मागे वळून बघितलेच नाही.

बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आपल्या वक्तव्यांमुळे बर्‍याचदा चर्चेत असते. त्याचबरोबर, ‘बंटी और बबली’, ‘ब्लॅक’ आणि मर्दानी सारखे सुपरहिट चित्रपट देणारी राणी देखील नेहमीच प्रसिद्धीत राहिली आहे. एका मुलाखतीदरम्यान, राणीला विचारले गेले होते की, ‘करीना कपूर हिच्याकडे अशी कोणती गोष्ट आहे, जी तुझ्याकडे नाही?’ राणीने लगेच या प्रश्नाला उत्तर देत सांगितले, ‘शाहिद कपूर.’

याव्यतिरिक्त जेव्हा जेव्हा राणी मुखर्जीला विचारले गेले की, ‘करीना कपूर खानकडे असे काय आहे जे तुझ्याकडेपण आहे?’ हा प्रश्न ऐकल्यावर राणी गोंधळते, पण करीना म्हणते की, ‘मला उत्तर माहित आहे, यश चोप्रा.’

राणी मुखर्जी हिने यश राज प्रॉडक्शनमधील ‘वीर-झारा’, ‘हम-तुम’, ‘बंटी और बबली’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘साथिया’ आणि ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती चोप्रा कुटुंबाची सूनही आहे. आदित्य चोप्राशी लग्नानंतर राणीने यशराज बॅनरच्या ‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी -2’ चित्रपटांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.

राणी मुखर्जीचा ‘बंटी और बबली- २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख कोरोनामुळे नुकतीच पुढे ढकलण्यात आली आहे. २००५ मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’चा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. यात सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रेक्षकांच्या भेटीला आलाय ‘घाघरा’! ‘देसी क्वीन’ सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा पुन्हा एकदा देशभरात जलवा

-लाल साडीत पत्नी निघाली माहेरी! अंकुश राजाच्या ‘नारियलवा जोड़े जोड़े’ने तोडले सर्व रेकॉर्ड!

-तब्बल दहा किलो वजन कमी केलेल्या श्वेता तिवारीच्या स्टनिंग लुकची सगळीकडेच चर्चा! पाहा ‘हे’ खास फोटोज


Leave A Reply

Your email address will not be published.