सलमान खानच्या (Salman Khan) लग्नाच्या आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या चर्चा अनेकदा होतात. भाईजानचे नाव ऐश्वर्या रायपासून संगीता बिजलानी, कतरिना कैफ, सोमी अली आणि युलिया वंतूरपर्यंत सर्वांशी जोडले गेले आहे. अलीकडेच, जेव्हा युलिया वंतूरचा वाढदिवस साजरा झाला, तेव्हाचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. खरंतर सलमान खानने त्याचा वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा केला. या सर्व नावांशिवाय आणखी एक नाव आहे जी सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड होती.
सलमान खानच्या बायोग्राफी ‘बीइंग सलमान’मध्ये सलमान वयाच्या १९ व्या वर्षी प्रेमात पडल्याचा उल्लेख आहे. त्याच्या मैत्रिणीचे नाव शाहीन जाफरी होते. हे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाचे नाव जसिम खान आहे, ज्यामध्ये सलमान आणि शाहीनबद्दल अनेक रंजक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
शाहीन ही दिवंगत अभिनेते अशोक कुमार यांची नात आहे. अशोक कुमार यांना भारती नावाची एक मुलगी आहे, ज्याचा विवाह अभिनेता सईद जाफरीचा भाऊ हमीद जाफरी यांच्याशी झाला होता आणि शाहीन त्यांच्या दोन मुलींपैकी एक आहे. शाहीन ही कियारा अडवाणीच्या आईची सावत्र बहीण आहे.
ही गोष्ट आहे त्या दिवसांची जेव्हा सलमान खान सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असे. त्यादरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले. दोघेही एकत्र जिमला जायचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक दिवस सलमान आणि संगीता बिजलानी तिथे भेटले आणि त्यांची मैत्री झाली. नंतर सलमान आणि संगीता एकमेकांच्या जवळ आले. त्याचवेळी शाहीनने ‘कॅथे पॅसिफिक एअरलाइन्स’मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती आणि ती सलमानपासून दूर गेली.
शाहीन जाफरी काम करत असताना एका प्रवासादरम्यान विक्रम अग्रवाल यांना भेटली. विक्रम अग्रवाल हा व्यावसायिक आहे. या भेटीचे लवकरच प्रेमसंबंधात रुपांतर झाले आणि त्यानंतर १९९४ मध्ये दोघांनी लग्न केले. या दोघांना निर्वाण अग्रवाल आणि नाद्या अग्रवाल ही दोन मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बारीक असल्याने बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला नाकारले होते काम… नंतर घडवला इतिहास !
आर्यन खानने खरेदी केली वडिलांची प्रॉपर्टी … ३७ कोटी रुपयांना खरेदी केले २ मजले










