Saturday, October 19, 2024
Home मराठी निक्की तांबोळीने काढली वर्षा उसगावकरांची अक्कल, त्या एका चुकीमुळे घडलं महाभारत

निक्की तांबोळीने काढली वर्षा उसगावकरांची अक्कल, त्या एका चुकीमुळे घडलं महाभारत

बिग बॉस मराठी नुकतंच सुरु झालय आणि दुसऱ्याच दिवशी स्पर्धकांमध्ये वाद घडून आला आहे. हा वाद निक्की तांबोळी आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या दरम्यान रंगला आहे. वर्षा यांच्या एका चुकीमुळे घरातल्या सगळ्या सदस्यांना जमिनीवर झोपावं लागल्याने अनेकांचा पारा चढला. जमिनीवर झोपावं लागणार असल्याने निक्की तांबोळीचा अनावर झालेला राग आजच्या एपीसोडमध्ये बघायला मिळेल.

पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने वर्षा उसगावकर झोपल्या होत्या. या गोष्टीमुळे बिग बॉसने त्यांच्यासकट सर्वच सदस्यांना शिक्षा दिली.बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमो मध्ये बिग बॉस म्हणत आहेत कि, “तुम्हाला बेड वापरण्याची परवानगी नाही. बिग बॉसच्या या आदेशानंतर सगळे सदस्य चिंतेत येताना दिसतात आणि मग वर्षा म्हणतात ‘ चुकून झालं’.

याच गोष्टीने निक्की तांबोळीचा पारा चढताना बघितला जाऊ शकतो. निक्की म्हणते, तुमच्या एका चुकीमुळे त्याची शिक्षा आम्हाला भोगावी लागतेय. यावर प्रत्युत्तर देताना वर्षा म्हणतात कि, माझ्या एकटीच्या चुकीमुळे नाही ! त्यावर निक्की म्हणते तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? त्यावर निक्कीला शांत करताना वर्षा तिला म्हणतात कि जास्त आरडाओरडा करू नकोस. हे सगळं होऊनही निक्की शांत बसत नाही आणि उलट त्यांनाच शांत बसायला सांगते. बिग बॉस मधील असाच टकराव प्रेक्षकांचं अनेक वर्षे मनोरंजन करत आला आहे

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिग बॉस फेम पायल मलिकला येत आहेत आत्महत्येचे विचार; म्हणाली, ‘लोक आम्हाला टार्गेट करतायेत’
“आजकाल ही सौंदर्याची व्याख्याच झाली आहे”, राजकुमार रावच्या प्लस्टीक सर्जरी बाबत इमरान हाश्मीने केले वक्तव्य

हे देखील वाचा