Monday, October 27, 2025
Home अन्य ‘मी परत येणार नाही’..! बिग बॉसच्या घरात दोन प्रेमींचं जोरदार भांडण…

‘मी परत येणार नाही’..! बिग बॉसच्या घरात दोन प्रेमींचं जोरदार भांडण…

बिग बॉस म्हणजे एखाद्या मसाला चित्रपटापेक्षा कमी नाही. इथे प्रत्येक दिवशी काही ना काही ट्वीस्ट येतात. बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सुरु होऊन आता एक आठवडा झाला आहे. आता घरातील गोष्टी हळू हळू बदलत आहेत. सिझन सुरु झाल्यापासून अरबाज आणि निक्की यांच्यामध्ये मैत्री बघायला मिळत होती. हळू हळू ती मैत्री प्रेमात बदलली. अरबाजने खुलेपणाने त्याचं प्रेमही दाखवलं होतं. मात्र आता कुठेतरी त्यांच्या प्रेमाला कुणाची तरी नजर लागली आहे असं वाटत आहे.

बिग बॉसच्या घरातील एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या व्हिडीओत प्रेमी युगुलांमध्ये मतभेद झाल्याचे दिसत आहेत. प्रोमो मध्ये निक्की म्हणते कि, आपण ज्याच्यावर हल्ला केला, त्यामुळे आपण चुकीचे दिसतोय. त्यावर अरबाज म्हणतो कि, “मी त्याच्या जॅकेटमधून फक्त चष्म्याचा बॉक्स काढला, बघितला आणि बाहेर आलो.” निक्की म्हणते कि हि मस्करी सुरू होती. पण जो सीन तयार झाला ना त्यामुळे आपण वाईट दिसलोय. निक्कीच्या या बोलण्यावर अरबाज भडकतो. “कुठे वाईट दिसलोय. एवढे तुम्ही नाजूक आहात तर घरी बसा.मला टच झालं तर मी बोलणार.आणि तू त्याची साईट घेऊ नको.” आणि असं म्हणून अरबाज तिथून निघून जातो.

पुढे निक्की अरबाजला म्हणते, मला “ॲटीट्युड दाखवू नको”, त्यावर अरबाज म्हणतो, “ॲटीट्युड तू दाखवत आहेस.” त्यानंतर निक्कीला राग अनावर होतो आणि निक्की त्याला म्हणते, मी तुला “ॲटीट्युड दाखवत नाहीये. तू इथून निघून गेलास. मी इथे गप्प उभी आहे, तू माझा अपमान केला आहेस. आता तू परत माझा आदर केल्याशिवाय मी परत येणार नाही.”

यादरम्यान, बिग बॉस मराठी च्या पहिल्या आठवड्यात. अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, सुरज चव्हाण, योगिता चव्हाण, धनंजय पवार, पुरुषोत्तम दादा पाटील. हे सदस्य नॉमीनेट झाले होते. त्यांच्यापैकी पुरुषोत्तम दादा पाटील हे घरातून बाहेर पडले आहेत . यंदाच्या सिझन मधून बाहेर पडणारे ते पहिले सदस्य ठरले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पतीसमोर मित्राने अंकिताच्या ड्रेसशी छेडछाड केल्याने अभिनेत्री भडकली; व्हिडीओ व्हायरल
बिग बॉस मराठीच्या घरात चोरी…! सूरज चव्हाणचे ३० हजार गेले …

हे देखील वाचा