बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनला सुरुवात झाली असून एक आठवडा देखील पूर्ण झाला आहे. पहिल्या आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील हे बाहेर पडले आहेत. दुसरा आठवडा देखील वेगवेगळे धमाके घेऊन येण्यास सज्ज आहे. मात्र सध्या घरात एक नवा ट्वीस्ट आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात चोरी झाली आहे.
नव्या प्रोमोत दिसतंय की, रात्रीच्या वेळी सूरज चव्हाणच्या झोपेचा फायदा घेत अरबाजने सूरजची ३०,००० रुपयांची बीबी करन्सी चोरून त्याच्या प्रोटीन पावडरच्या डब्यात ठेवतो. आता या घटनेचा घरात कसा परिणाम होतो हे बघावे लागणार आहे. सूरजला हे कळेल का? आणि अरबाजला याची शिक्षा मिळेल का, हे बघणे रंजक ठरणार आहे.
बिग बॉस मराठी च्या एका दुसऱ्या प्रोमोत जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण भांडत आहेत. जान्हवी म्हणताना दिसत आहे की, तुला काय काय चावी मिळाली का ? आठवडाभर तर शांतच होतास ना ? माझ्यासमोर शहाणपणा करायचा नाही. त्यावर सूरज तिला म्हणतो कि, “तू निघ … चल फूट.” सुरज आधी शांत होता. आता मात्र तो त्याच्या फॉर्मात येतोय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
या अभिनेत्यामुळे तृप्ती डिमरीचा चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला; म्हणाली, ‘माझा अभिनय…’
नेहा भसीन पीएमडीडी-ओसीपीडीने त्रस्त, सोशल मीडियावर शेअर केली माहिती