बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्या त्यांचे थ्रोबॅक व्हिडिओज शेअर करुन, त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहतात. अभिनेत्रीने बुधवारी (५ मे) आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा जिवंत केले आहे. नुकताच त्यांनी स्वत: चा एक खूप जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या एक बाल कलाकाराच्या रूपात दिसत आहेत. नीतूंचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंत पडला आहे.
नीतू कपूर यांनी १९६८ साली आलेल्या, त्यांच्या ‘दो कलियां’ या चित्रपटाची एक क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. या व्हिडिओ क्लिपमध्ये नीतू कपूर फारच लहान दिसत आहेत. यात नीतू कपूर ‘मुर्गा-मुर्गी प्यार से देंखे नन्हा चूचा खेल करे’ या गाण्यावर अभिनय करताना दिसत आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीही कमेंट करून, आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओवर त्यांची मुलगी रिद्धिमा कपूरने कमेंट केली आणि लिहिले की, “सर्वात गोंडस.” मारवा हुसेनने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, “खूप सुंदर नीतू आंटी! आता सामरा देखील असेच एक्सप्रेशन्स देते.” जयश्रीने लिहिले, “सर्वात मनमोहक.” सोनी रझदानने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, “अरे देवा, तुम्हाला काही कळाले नाही! तुम्ही तेव्हाही सुंदर होता आणि अजूनही आहात.”
यापूर्वीही नीतूंनी ९० च्या दशकातील त्यांच्या आणि जितेंद्र यांच्या ‘आतिश’ चित्रपटाच्या गाण्याची झलक सादर केली होती. नीतू कपूर यांनी १९७९ साली आलेल्या, त्यांच्या जुन्या ‘आतिश’ या चित्रपटाच्या गाण्यातील आपल्या लूकबद्दल एक मजेदार कॅप्शनही लिहिले होते. या संबंधित व्हिडिओ शेअर करत नीतूंनी लिहिले की, “मला नेहमीच हा प्रश्न पडतो की, मला या चिमणीसारखे का केले गेले होते?”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…