Friday, April 19, 2024

ऑक्सिजन लेव्हल वाढवण्याची पद्धत शिकवणाऱ्या कलाकारांवर अभिनेत्रीने साधला निशाना, म्हणाली…

संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा हाहाकार वाढला आहे. याचा परिणाम पुन्हा एकदा समाजातील प्रत्येक घटकावर होत आहे. तरीही अनेकजण त्यांना जमेल तशी कोरोना रुग्णांना मदत करत आहेत. अनेक बॉलिवूड कलाकार देखील मदत करत आहे. अशातच बॉलिवूडमधील अनेक कलाकार व्हिडिओ शेअर करून ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवायची म्हणजेच प्रोनिंग टेक्निक शिकवत आहेत. असे प्रकार करणाऱ्यांवर टेलिव्हिजन अभिनेत्री‌ निया शर्मा हिने जोरदार निशाणा साधला आहे. नियाने अशा व्यक्तींना सांगितले आहे की, आमच्याकडे गुगल आहे. तसेच तिने सगळ्यांना या बाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचवले आहे.

निया शर्माने तिच्या ट्विटचा स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने यात लिहिले आहे की, “हे त्या लोकांसाठी आहे जे सध्या सोशल मीडियावर प्रोनिंग टेक्निक शिकवत आहेत. तुम्हाला खरच जागरूकता करायची आहे, तर तुम्ही डॉक्टरांनी शेअर केलेले व्हिडिओ शेअर करा. डॉक्टरांनी सांगायच्या आधी तुम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हते. तसेच आपल्याकडे गुगल देखील आहे.”

ही पोस्ट शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “या सोबतच तुमच्या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही हे देखील दाखवा की, तुमच्याकडे शिकवण्याचा परवाना आहे की नाही ते.” नियाने केलेल्या या पोस्टनंतर अनेक‌ जणांनी तिला खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण नियाने शेअर केलेल्या या पोस्टबाबत सहमत आहेत, तर या पोस्टवर कमेंट करत नकुल मेहताने या व्हिडिओची लिंक तिच्याकडे मागितली आहे.

निया शर्माच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘काली: एक अग्नी परीक्षा’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली आहे. स्टार प्लसवरील ‘एक हजारो में मेरी बहना है’ या मालिकेत तिने काम केले. त्यांनतर तिने ‘जमाई राजा’, ‘इश्क में मरजावा’, ‘नागीण’ आणि ‘खतरों के खिलाडी 8’ यामध्ये काम केले आहे. तसेच तिने विक्रम भट्ट यांच्या ‘ट्विस्टेड’ या वेबसीरिजमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जुही चावलाची मुलगी करणार बॉलिवूड पदार्पण? आयपीएल ऑक्शन दरम्यान झाली होती शाहरुख खानच्या मुलासोबत स्पॉट

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट

-लय भारी! अभिनेता सोनू सूदच्या टीमने वाचवले बंगळुरूमधील २२ कोरोना रुग्णांचे जीव, रात्रभर केला ऑक्सिजनचा पुरवठा

हे देखील वाचा