लग्नानंतरही सुगंधा आणि संकेत करतायत चाहत्यांचे मनोरंजन, पाहा त्यांची ही कॉमेडी, हसून हसून तुम्हीही व्हाल लोटपोट


‘द कपिल शर्मा शो’मध्ये शिक्षक म्हणून लोकांना हसवणारी सुगंधा मिश्रा आणि त्याच कार्यक्रमात दमदार मिमिक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या कॉमेडियन संकेत भोसले, हे कायमच प्रेक्षकांना हसवत असतात. या दोघांनीही  गेल्याच महिन्यात २६ एप्रिल रोजी लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाची बरीच चर्चा अजूनही रंगली आहे. लग्नानंतर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. सुगंधा आणि संकेत चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. यानंतर आता त्यांचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होता.

या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत कायम आहे. या व्हिडिओमध्ये सुगंधाने हे स्पष्ट केले आहे की, तिचा पती हे सांभाळून घेणारा पती आहे. हा एक अतिशय मजेदार व्हिडिओ आहे.

सुगंधा मिश्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुगंधा संकेतला म्हणते की, ‘ऐक.’ यावर संकेत म्हणतो ‘हो.’ त्यानंतर ती म्हणते, ‘जिलेबी खायची आहे का?’ संकेत म्हणतो ‘होय.’  मग संकेत विचारतो, ‘जिलेबी बनवता येते?’ यावर सुगंधा उत्तर देते, ‘नाही, पण मी प्रयत्न करू शकते.’ तो म्हणतो, ‘ठीक आहे, प्रयत्न कर.’ मग सुगंधा म्हणते, ‘पण मीठ संपलं आहे.’ हे ऐकल्यावर संकेतला काय बोलायचे हे समजत नाही. यानंतर संकेत सुगंधाला म्हणतो, की, ‘साखर आहे?’ ती होय म्हणते. मग त्यावर संकेत म्हणतो, ‘भजी बनव.’

दोघांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडतो आहे. तसेच दोघांच्या व्हिडिओतील मस्त गमतीशीर वेेळेेचे कौतुकही केले जात आहे.

यापूर्वी सुगंधाने लग्नानंतर विशेष समारंभांचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले होते. सुगंधा मिश्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेले अनेक व्हिडिओ आणि फोटोंपैकी वर- वधू खूप आनंदी दिसत होते. व्हिडिओमध्ये, आपण पाहू शकता की, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये घरात प्रवेश करताना, आणि कुटुंबियांसह मजा करताना सुगंधा सासरी खूप उत्साही दिसत होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सर्वांसमोर अचानक कॅटरिना कैफचा ड्रेस खिसकताच ‘भाईजान’ने केलं असं काही; पाहा व्हिडिओ

-सोनू सूदच्या घराबाहेर मदतीसाठी लोकांची गर्दी, कौतुक करत चाहतेे म्हणाले ‘तो हनुमान आहे’

-आयपीएलमध्ये खुलेआम केले होते किस, का झाले होते दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ मल्ल्याचे ब्रेकअप? अभिनेत्रीने केले स्पष्ट


Leave A Reply

Your email address will not be published.